forest department bison fell into 20 feet deep well in Mahabaleshwar satara sakal
सातारा

महाबळेश्वरात 20 फूट खोल विहिरीत पडला रानगवा

बंगल्यातील कर्मचाऱ्यांनी कोरड्या विहिरीत हा रानगवा पडल्याचे पाहिले व त्यांनी ही माहिती वनविभागास कळवली

अभिजीत खुरासणे

महाबळेश्वर : श्री क्षेत्र महाबळेश्वर परिसरात असलेल्या एका खासगी बंगल्याच्या अंदाजे वीस फूट खोल कोरड्या विहिरीत रानगवा पडला. ही घटना गुरुवारी रात्रीच्या सुमारास घडली. शुक्रवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास या बंगल्यातील कर्मचाऱ्यांनी कोरड्या विहिरीत हा रानगवा पडल्याचे पाहिले व त्यांनी ही माहिती वनविभागास कळवली. वनविभागाचे वनक्षेत्रपाल श्रीकांत कुलकर्णी यांच्यासह वनविभागाची टीम तसेच महाबळेश्वर ट्रेकर्स,प्रतापगड रेस्क्यू टीम व क्षेत्र महाबळेश्वर ग्रामस्थ घटनास्थळी दाखल झाले. वनविभागाने पुणे येथील तज्ज्ञांची रेस्क्यू टीम बोलाविली ही टीम दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घटनास्थळी दाखल झाली. या रेस्क्यू टीमच्या डॉक्टरांनी या रानगव्यास भुलीचे इंजेक्शन दिले.

तद्नंतर रेस्क्यू टीम पुणे,महाबळेश्वर व प्रतापगड टीमच्या जवानांच्या दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर क्रेनच्या साहाय्याने या रानगव्यास सुखरूपपणे विहिरीबाहेर काढण्यात यश आले. या जखमी अवस्थेतील गव्यास अधिक उपचारांसाठी पुणे येथे नेण्यात आले आहे. यावेळी वनविभागाचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. चंदन सवणे उपस्थित होते. या बचावकार्यात पुणे रेस्क्यू टीमचे तुहीन सातारकर,नरेश चांडक,सुश्रुत शिरभाते,असीम पटेल,सायली पिलाने,अमित तोडकर,हर्षद नागरे,तय्यब सय्यद,सुरेश घाडगे,अनिकेत सयम यांच्यासह महाबळेश्वर ट्रेकर्सचे सुनिलबाबा भाटिया, सुनील केळगने, अमित कोळी, जयवंत बिरामणे, मंगेश साळेकर, अनिकेत वागदरे, अतेश धनावडे, प्रतापगड रेस्क्यू टीमचे अजित जाधव, दर्शन जाधव, आशिष बिरामने, अभि भिलारे, संकेत भिलारे, जवानांसह क्षेत्र महाबळेश्वर येथील युवकांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली.

बचावकार्य उपवनसंरक्षक महादेव मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. वनसंरक्षक सुधीर सोनावले यांच्या उपस्थितीत पार पडले. यावेळी वनक्षेत्रापाल श्रीकांत कुलकर्णी, वनपाल सहदेव भिसे, रमेश गडदे, वनरक्षक लहू राऊत, अभिनंदन सावंत यांच्यासह क्षेत्र महाबळेश्वरचे सरपंच सुनील बिरामने, प्रदीप कात्रट, प्रशांत कात्रट, सह्याद्री प्रोटेक्टर्सचे संदेश भिसे, दत्तात्रय बावळेकर आदी उपस्थित होते. या बचावकार्यात सहकार्य करणाऱ्यांचे वनविभागाच्यावतीने वनक्षेत्रपाल श्रीकांत कुलकर्णी यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MNS Warning: "बाप बनण्याचा प्रयत्न करू नका, मेहता-बिहतांनी..." ; मिरा भाईंदर व्यापार्‍यांच्या बंद नंतर मनसेचा आक्रमक इशारा!

Amit Shah : अमित शहा यांचे पुण्यात आगमन; अनेक कार्यक्रमांना उपस्थिती

Latest Maharashtra News Updates : अमित शहांचा आज पुणे दौरा, वाहतुकीत बदल

Asian Hockey Cup: क्रीडा मंत्रालयाकडून पाकला हिरवा कंदील; भारतात खेळण्याची परवानगी

Kolhapur Police : कोल्हापुरातील गुंडगिरी संपवण्यासाठी एसपी अॅक्शन मोडवर, कुचकोरवी उर्फ एस. के. गॅंगच्या १७ जणांना केलं हद्दपार

SCROLL FOR NEXT