पंचायत समिती Sakal
सातारा

भुईज : घरपट्टी न भरल्याने माजी उपसभापतीचे सदस्यत्व रद्द

अनिल जगताप यांनी सन २०१७ एप्रिल पासून ते सन २०१९ सप्टेंबर पर्यंत घरपट्टी भरलेली नव्हती.

विलास साळुंखे

भुईज : वाई पंचायत समिती माजी उपसभापती व केंजळ गणाचे सदस्य अनिल बुवासाहेब जगताप यांनी अडीच वर्षे घरपट्टी न भरल्याने त्यांचे विरोधात त्यांचे प्रतिस्पर्धी प्रविण विनायक जगताप व प्रदीप कृष्णा क्षीरसागर यांनी दाखल केलेल्या याचिकेवर पुणे विभागीय आयुक्त यांनी अंतीम निकाल दिल्याने अनिल जगताप यांचे सदस्यत्व रद्द करण्याचे आदेश दिले आहेत.

याबाबत किसनवीर कारखान्याचे संचालक व प्रतिस्पर्धी प्रविण विनायक जगताप व प्रदीप कृष्णा क्षीरसागर यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत माहिती देताना त्यांनी विभागीय आयुक्तांची निकाल प्रत दाखवत चाई पंचायत समितीचे सदस्य अनिल जगताप हे अपात्र झाल्याचे सांगितले.

सदर अपात्रतेची सुनावणी पुणे विभागीय आयुक्तांच्या पुढे झाली होती. त्याचा अंतिम निकाल १ नोव्हेंबर २०२१ ला लागला होता. त्याची पत याचिकाकर्ते प्रविण जगताप यांना १ डिसेंबर २०२१ ला मिळाली. त्यानंतर प्रविण जगताप यांनी सदरची माहिती भुईज येथे पत्रकार परिषद घेवून दिली. वाई पंचायत समिती सदस्य अनिल जगताप यांनी सन २०१७ एप्रिल पासून ते सन २०१९ सप्टेंबर पर्यंत घरपट्टी भरलेली नव्हती.

दरम्यान केंजळ ग्रामपंचायतीने दोन ते तीन वेळा याबाबत नोटीस दिलेली होती. परंतु शासकिय यंत्रणा आणि सदरचा अपात्र सदस्य हा सत्ताधारी पक्षाचा असल्याने त्याने या गोष्टीकडे दुर्लक्ष केले. दरम्यान याबाबत किसनवीर सातारा साखर कारखान्याचे संचालक प्रविण जगताप व प्रदीप क्षीरसागर यांनी माहितीच्या अधिकारा खाली माहिती मागवून अनिल जगताप यांनी हे शासकिय देणे भरले नसल्याचे निदर्शनास आणून त्याबाबत पुणे विभागीय आयुक्ताकडे सन २०१९ ला दाद मागितली. परंतु कोविड १९ च्या लॉकडाऊन मुळे ही सुनावणी लांबली गेली व तिचा निकाल १ नोव्हेंबर २०२१ लागला व विभागीय आयुक्ताने अनिल जगताप यांना अपात्र ठरवले.

यावेळी बोलताना याचिकाकर्ते प्रविण जगताप म्हणाले की निकाल जरी उशीरा लागला असला तरी मला न्याय मिळाला सत्य हे सत्यच असते ते मॅनेज होत नाही. या सुनावणीत मी स्वतः आयुक्तांपुढे युक्तीवाद केला त्यानंतर सत्याचा विजय झाला याचा मला आनंद आहे. माझे कार्यकर्ते समर्थक कंजळ ग्रामस्थ यांचे हे सांधिक श्रेय आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT