सातारा

पाटण वन विभागाची दमदार कामगिरी; चार गव्यांना वाचविण्यात यश

सचिन शिंदे

कऱ्हाड (जि. सातारा) : पाटण तालुक्यातील मोरगिरी नजीकच्या धावडे गावात पाण्याच्या शोधार्थ आलेले पाच गवे कठड्यावरुन विहीरीत कोसळले. शनिवारी रात्री उशिरापर्यंत वन विभागाने जेसीबीच्या साह्याने राबविलेल्या मदत कार्यामुळे चार गव्यांना वाचविण्यात यश आले आहे. परंतु एक गव्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. 

मोरगिरीजवळच्या धावडे गावात पाण्याच्या शोधात आलेले पाच गवे विहिरीत कोसळले. ही घटना शनिवारी सांयकाळी साडे सातच्या सुमारास घडली. गवे विहिरीत पडल्याचे समजताच पाटणचे वन क्षेत्रपाल व अन्य सर्व सहकारी त्वरीत घटनास्थळी पोचले. तेथील स्थिती पाहता बचाव कार्यसाठी जेसीबी व क्रेन मागविण्यात आली. जेसीबीने विहीरचे कठडे एकबाजूने फोडण्यात आले. 

त्यामुळे त्या बाजूने गावे बाहेर पडण्यात यशस्वी झाले. त्यातील चार गवे वाचले. त्यात दोन माद्या व दोन पिल्लांचा समावेश होता. विहिराचा कठडा तोडल्याने पाचपैकी चार गव्यांना  वाचविण्यात यश आले. परंतु एका गव्याचा पाण्यात बुडन मृत्यू झाल्याचे बचाव कार्यात सहभागी झालेल्या ग्रामस्थांनी सांगितले.
 

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET Paper Leak Case : नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयचा मोठा खुलासा; कोर्टात उघड झाले धक्कादायक तपशील, मनिषा मांढरेचा घटनाक्रम सांगितला

Night Heat Reason : सूर्य मावळला तरी घरात उकडतंय? रात्रीसुद्धा एवढं गरम का वाटतं? वैज्ञानिकांनी सांगितलं आश्चर्यकारक कारण

Shaktipeeth Highway Protest : शक्तीपीठ महामार्गाविरोधात सोलापुरातील शेतकरी संतप्त, पुणे-सोलापूर महामार्ग ठप्प; राजू शेट्टी पोलिसांत शाब्दिक चकमक

“लोकसंख्या कमी करायची जबाबदारी आहे माझ्यावर…” शंशाक केतकर व्हिडिओ शेअर करत म्हणाला... 'हिंदू आहे आणि...'

Latest Marathi News Live Update : दहावी-बारावीच्या उत्तरपत्रिकेतील छेडछाड आता गुन्हा ठरणार

SCROLL FOR NEXT