सातारा

सातारा जिल्ह्यात 48 रुग्ण उपचारानंतर घरी परतले, 523 जणांचे नमुने तपासणीला

सिद्धार्थ लाटकर

सातारा : सातारा जिल्ह्यातील विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या 48 नागरिकांना आज (गुरुवार) दहा दिवसांनतर घरी सोडण्यात आले आहे अशी माहिती जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.

यामध्ये जावली तालुक्यातील आखेगणी येथील 65 वर्षीय पुरुष, 16 वर्षीय युवक, 40 वर्षीय महिला, बीरमानेवाडी येथील 52 वर्षीय पुरुष, बामणोली येथील 46 वर्षीय पुरुष, रामवाडी येथील 57,  42, 48, 43, 55 वर्षीय महिला, 48वर्षीय पुरुष, कोरेगाव तालुक्यातील चौधरीवाडी येथील 32 वर्षीय पुरुष, करंजखोप येथील 8 वर्षाची बालिका, जांभ खुर्द येथील 31 वर्षीय पुरुष, दुरगळवाडी येथील 23 वर्षीय पुरुष, कराड तालुक्यातील महारुगडेवाडी येथील 21 व 46 वर्षीय पुरुष, 75 वर्षीय महिला, तारुख येथील 22, 54, 32, 35 वर्षीय महिला, 11 वर्षाचा बालक, 40 वर्षीय पुरुष, काळेवाडी येथील 8 वर्षाचा बालक, तुळसण येथील 60 वर्षीय पुरुष, कराड येथील घोलेश्वर येथील 46 वर्षीय पुरुष, उंब्रज येथील 47 वर्षीय पुरुष, 45 वर्षीय महिला, मलकापूर येथील एक पुरुष, खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथील न्यु कॉलनी येथील 60 वर्षीय महिला, येलगाव येथील 65 वर्षीय पुरुष, हिंगणोली येथील 54 वर्षीय पुरुष, बनवडी येथील 32 वर्षीय पुरुष, वाई तालुक्यातील धरमपुरी येथील 35 वर्षीय पुरुष, सातारा तालुक्यातील दौलतनगर येथील 39 वर्षीय पुरुष, रेल्वेस्टेशन येथील 32 वर्षीय पुरुष, लिंब येथील 40 वर्षीय पुरुष, पाटण तालुक्यातील उरुल येथील 30 वर्षीय पुरुष, बोडरी येथील 34 वर्षीय पुरुष, सांगवड येथील 31 वर्षीय पुरुष, फलटण रविवार पेठ येथील 68, 25, 62,60 वर्षीय महिला, जिंती येथील 44 वर्षीय महिला, गुणवरे येथील 51 वर्षीय पुरुष, आदरुड येथील 35 वर्षीय पुरुष.

523 जणांचे नमुने पाठविले तपासणीला

क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील 22, कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथील 71, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड येथील 57, ग्रामीण रुग्णालय फलटण येथील 20, कोरेगाव येथील 27, वाई येथील 40, शिरवळ येथील 92, रायगाव येथील 23, पानमळेवाडी येथील 42, मायणी येथील 9, महाबळेश्वर येथील 13, पाटण येथील 79, खावली येथील 28 असे एकूण 523 जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने एन.सी.सी.एस. पुणे व कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे, असेही डॉ. गडीकर यांनी कळविले आहे.

राजमातांचे वकीलपत्र मागे घे, अन्यथा संपवू : दाेघांची धमकी 

चार महिन्यांनंतर या शहरात कोरोनाचा शिरकाव 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT