Robbers Arrested
Robbers Arrested sakal
सातारा

दरोडेखोरांची टोळी जेरबंद

सकाळ वृत्तसेवा

लोणंद - दरोड्याच्या तयारीतील टोळीला जेरबंद करून त्यांच्याकडून लोणंद पोलिसांनी लोणंद, बारामती, फलटण तालुक्यांतील विहिरीवरील इलेक्ट्रिक मोटार चोरीचे नऊ गुन्हे उघडकीस आणले आहेत. या प्रकरणी पाच संशयितांना अटक केली आहे. त्यांच्याकडून एक लाख ५४ हजारांचा ऐवज हस्तगत करत लोणंद पोलिसांनी कारवाई केली आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, पोलिसांचे रात्रगस्तीचे पथक हे गस्त घालताना पाडेगाव येथील नेवसे वस्ती (ता. फलटण) गावचे हद्दीत दरोडा घालण्याच्या तयारीत असलेल्या महंमद अल्ली रमजान अल्ली (वय ३२, रा. परसा स्टेशन, ता. सोरतगढ, जि. सिद्धार्थनगर उत्तर प्रदेश सध्या रा . बाळुपाटलाचीवाडी, ता. खंडाळा), महंमद इम्रान अब्दुल मोहीद (वय ३७, रा. रोमनदेही, सोरतगढ, जि. सिद्धार्थनगर, उत्तर प्रदेश सध्या रा . बाळुपाटलाचीवाडी, ता. खंडाळा), शिवा संत भगवानदास कनोजिया (वय ३५, रा. डुबरी ता. तुलसीपूर, जि. बलरामपूर, उत्तर प्रदेश, फकरुऊद्दीन बहादूर खान (वय २०, रा. पिपरा, जि . बलरामपूर उत्तर प्रदेश), आलमस ऊद खान (वय ४२, रा. रोमनदेही, ता. सोरतगढ, जि. सिद्धार्थनगर उत्तर प्रदेश सध्या रा. बाळुपाटलाची वाडी, ता. खंडाळा) या पाच जणांना त्यांच्याकडील हत्यारासह ताब्यात घेतले.

त्यांच्याकडे तपास करून लोणंद, तसेच फलटण व बारामती तालुक्यांतील शेतकऱ्यांच्या विहिरीवरील चोरी केलेल्या इलेक्ट्रिक मोटारी, एक पंप व पाण्याचे व्हॉल्व्ह असे एकूण एक लाख ५४ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. त्यांच्याकडून लोणंद, फलटण ग्रामीण व वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्याकडील एकूण नऊ गुन्हे उघडकीस आणले आहेत.

जिल्हा पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अतिरिक्त पोलिस अधीक्षक अजित बोऱ्हाडे, पोलिस उपअधीक्षक तानाजी बरडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक विशाल वायकर, पोलिस उपनिरीक्षक गणेश माने, सहायक फौजदार महेश सपकाळ, विष्णू धुमाळ, कयुम मुल्ला, हवालदार अविनाश नलवडे, संतोष नाळे, अतुल कुंभार, श्रीनाथ कदम, विठ्ठल काळे, सर्जेराव सूळ, सिद्धेश्वर वाघमोडे, बापूराव मदने, अभिजित घनवट, अविनाश शिंदे, फैयाज शेख, गोविंद आंधळे, कापडगावचे पोलिस पाटील नंदकुमार खताळ, तसेच मिरेवाडी गावचे पोलिस पाटील पंढरीनाथ नरुटे यांनी कारवाईमध्ये सहभाग घेतला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR Live Score: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT