Give reservation as Marathas and not as OBC women presented Maratha community demand before the Chief Minister eknath shinde knp94 
सातारा

Maratha Reservation: सामाजिक सलोखा बिघडेल, मराठ्यांना वेगळंच आरक्षण द्या; मराठा समाजाकडून मुख्यमंत्र्यांना घेराव

सकाळ वृत्तसेवा

सातारा- दरे गावातील जननी देवीच्या मंदिरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजबांधवांची एक अनौपचारीक बैठक घेतली. मराठा समाजातील २५० ते ३०० जण या बैठकीला उपस्थित होते. यावेळी एका मराठा समाजाच्या भगिनीने मराठ्यांना वेगळं आरक्षण द्या, ओबीसीतून आरक्षण देऊ नका, अशी भूमिका मांडली.

मुख्यमंत्री या लोकांसोबत मांडी घालून खाली जमिनीवर बसले होते. मराठा आरक्षण आणि कुणबी दाखले मिळवून देण्यासंदर्भात सरकारच्या माध्यमातून सुरू असलेल्या कामाची माहिती मुख्यमंत्र्यांनी उपस्थितांना समजावून सांगितली.

मुख्यमंत्र्यांच्या प्रयत्नांबाबत उपस्थितांनी त्यांचे कौतुक केले. मराठा समाज ठामपणे तुमच्या पाठीशी खंबीर आहे अशी भूमिका त्यांनी मांडली. गरजवंत मराठ्यांना तुमच्याकडूनच मोठी अपेक्षा आहे. तुमच्याशिवाय मराठ्यांना कुणही आरक्षण मिळवून देऊ शकत नाही. दुसऱ्या मराठा नेत्यांची तशी मानसिकता कधी नव्हती आणि आजही नाहीये असाही चर्चेचा सुर होता.

आम्हाला कुणबी म्हणून आरक्षण नकोय. कुणबी आरक्षणात आधीच ३०० -३५० जाती पोटजाती आहेत. त्यात गेल्यानंतर एखाद्याला आरक्षणाचा फायदा मिळणारच नाही. त्यापेक्षा ईडब्ल्यूएसमधून जास्त फायदा मिळतोय, असं यावेळी लोकांनी म्हटलं.

ओबीसी आणि मराठा समाजामध्ये त्यामुळे वितुष्ट निर्माण होईल. त्यातून राज्याचा सामाजिक सलोखा बिघडेल. त्यामुळे आम्हाला मराठा म्हणूनच आरक्षण हवंय आणि तुम्हीच ते आम्हाला मिळवून देऊ शकता अशी भूमिका एका महिलेने मांडली. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'वारीत कोणी विशेष अजेंडा चालवण्यासाठी येत असतील, तर ते आम्ही खपवून घेणार नाही'; CM फडणवीसांचा कोणाला इशारा?

Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न; पंढरपुरात 20 लाखाहून अधिक भाविक दाखल

Ashadhi Ekadashi : विठ्ठलाच्या पूजेचा मान मिळालेले उगले दाम्पत्य कोण आहे? मुख्यमंत्र्यांसोबत मिळाला शासकीय महापूजेचा मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : 'महाराष्ट्र चालवण्याची विठुरायाने शक्ती द्यावी', मुख्यमंत्री फडणवीसांनी पांडुरंगाला घातले साकडे

SCROLL FOR NEXT