Gore-Nimbalkar on the campaign trail again in Madha lok sabha election 2024 Sakal
सातारा

गोरे-निंबाळकर जोडगोळी पुन्हा माढ्याच्या मोहिमेवर

भाजपने पुन्हा एकदा संधी दिल्याने उत्साहित झालेल्या खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी आपल्या प्रचाराची सुरुवात नेतेमंडळी कार्यकर्त्यांच्या भेटीगाठीने केली.

रूपेश कदम

खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी माढ्याच्या मोहिमेस आमदार जयकुमार गोरे यांच्या सोबतीने सुरुवात केली आहे. या मोहिमेस कार्यकर्त्यांचा तसेच मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे.

भाजपने पुन्हा एकदा संधी दिल्याने उत्साहित झालेल्या खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी आपल्या प्रचाराची सुरुवात नेतेमंडळी कार्यकर्त्यांच्या भेटीगाठीने केली. आमदार जयकुमार गोरेंसह या दौऱ्याची सुरुवात माळशिरसचे आमदार राम सातपुते यांच्या मांडवे येथील ‘श्रीराम’ या निवासस्थानी चहा, नाश्ता करून झाली.

यावेळी ताकदीने काम करून नरेंद्र मोदींचे हात बळकट करण्यासाठी खासदार रणजितसिंह यांना मोठ्या मताधिक्याने निवडून देण्याची ग्वाही दिली. त्यानंतर माळशिरसमध्ये पुण्यश्‍लोक अहल्यादेवी होळकर व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन केले. त्यानंतर भाजपच्या किसान मोर्चाचे सोलापूर जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सरगर यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांशी हितगूज केले.

माळीनगर शुगर्सचे अध्यक्ष राजेंद्र गिरमे यांच्या निवासस्थानी कारखान्याचे संचालक व गिरमे समर्थकांशी चर्चा केली. यावेळी राजेंद्र गिरमे यांनी खासदार रणजितसिंह व आमदार गोरे यांचा सत्कार केला. खासदारांनी मागील पाच वर्षांत केलेल्या कामाचा विशेषतः पाणीप्रश्न मार्गी लावल्याबद्दल समाधान व्यक्त केले.

माढा लोकसभा निवडणुकीचे मुख्य केंद्र असलेल्या निमगाव (टेंभुर्णी) येथील आमदार बबनराव शिंदे, आमदार संजयमामा शिंदे व सोलापूर दूध संघाचे अध्यक्ष रणजित शिंदे यांच्या निवासस्थानी खासदार निंबाळकर व आमदार गोरे यांनी भेट दिली.

यावेळी माढा व करमाळा मतदारसंघासाठी खासदार निंबाळकर यांनी दिलेल्या योगदानातून उतराई होण्यासाठी खासदारांना निवडून आणण्याची संपूर्ण जबाबदारी शिंदे कुटुंबीयांनी घ्यावी अशी चर्चा झाली. त्यानंतर माजी आमदार धनाजी साठे, राजाभाऊ चवरे, सांगोल्यात दीपक साळुंखे, आमदार शहाजी पाटील यांच्या निवासस्थानी भेट देऊन पुढील रणनितीबद्दल चर्चा केली.

दौऱ्यात खासदार रणजितसिंह यांचे ठिकठिकाणी स्वागत केले. यावेळी सोलापूरचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार, लोकसभा संयोजक जयकुमार शिंदे, शशिकांत चव्हाण, लतीफ तांबोळी, माळशिरसचे नगराध्यक्ष अप्पासाहेब देशमुख, सुदर्शन यादव, प्रकाश घोडके, सोपानराव नारनवर, संजय देशमुख, शिवराज पोकळे, हणमंत कर्चे, भैया धाईंजे व त्याचे सर्व सहकारी, भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi Cabinet Reshuffle : १२ मंत्र्यांना हटवले होते; मोदी सरकारचा शेवटचा मंत्रिमंडळ फेरबदल कधी झाला होता? आता दिग्गजांची गच्छंती?

IND vs ENG 1st T20I: वैभव सूर्यवंशीची सोशल मीडियावर हवा! श्रेयस अय्यर म्हणतो, मला ती दिसत नाही, कारण...; विधानाची जोरदार चर्चा

विहानला खेळायला जायचंय, तो येईल; बसवर झाड कोसळून मुलाचा मृत्यू, आई पाहतेय वाट, घरासमोरच घडली दुर्घटना

Petrol-Diesel Price: पेट्रोल 5 रुपये, डिझेल 3 रुपये स्वस्त! जुलैच्या पहिल्याच दिवशी मोठा दिलासा; 2 वर्षांनंतर पहिली दरकपात

MPSC Exam : ‘एमपीएससी’च्या परीक्षा आता होणार संगणकाधारित; भरती प्रक्रिया अधिक पारदर्शक करण्यासाठी निर्णय

SCROLL FOR NEXT