सातारा

ग्रामपंचायत निवडणुकीत आम्हीच मारलं मैदान; साता-यात सर्वपक्षीयांचा दावा

उमेश बांबरे

सातारा : ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालावरून सर्वच पक्षांनी ग्रामपंचायतींवर दावे केले आहेत. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी 487 ग्रामपंचायतींवर दावा केला आहे, तर शिवसेनेने मुसंडी मारत जिल्ह्यातील 170 ग्रामपंचायतींत सत्ता मिळविली असून, कॉंग्रेसला मात्र, 50 ग्रामपंचायतींत यश मिळाल्याचे सांगितले जात आहे. 878 ग्रामपंचायतींपैकी 487 ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीप्रणित पॅनेलची सत्ता आल्याचा दावा राष्ट्रवादीकडून केला जात आहे. भाजपकडून 290 ग्रामपंचायतींवर दावा केला आहे. राष्ट्रीय समाज पक्षाला माण तालुक्‍यात एक ग्रामपंचायतीत सत्ता मिळाली आहे.
 
ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल लागला आणि जिल्ह्यातील विविध पक्षांनी आपापल्या स्थानिक गटांच्या किती ग्रामपंचायती आल्या हे सांगण्यास सुरवात केली आहे. जिल्ह्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे वर्चस्व असले, तरी शिवसेना व भाजपनेही आता स्थानिक पातळीवर आपली ताकद निर्माण केली आहे. कॉंग्रेसची ताकद कमी कमी होत चालल्याचे चित्र आहे. आजच्या निकालावरून राष्ट्रवादीच्या नेत्यांनी 621 ग्रामपंचायतींवर महाविकास आघाडीची सत्ता आल्याचे सांगितले आहे. याचे विश्‍लेषण करताना 487 ग्रामपंचायती राष्ट्रवादीच्या विचारांच्या 115 ग्रामपंचायती शिवसेनेच्या, तर कॉंग्रेसच्या केवळ 26 ग्रामपंचायती असल्याचा दावा केला आहे. दुसरीकडे भाजपकडून 290 ग्रामपंचायतींवर भाजप पुरस्कृत पॅनेलची सत्ता आली असल्याचा दावा केला आहे. शिवसेनेकडून 170 ग्रामपंचायतींत सत्ता आल्याचे सांगून पाटण 71, कोरेगाव 42, वाई 26, सातारा 13, कऱ्हाड उत्तर पाच, कऱ्हाड दक्षिण दोन, माण 12 ग्रामपंचायती त्यांच्या स्थानिक गटाच्या आल्याचे सांगितले जात आहे. कॉंग्रेसकडून महाविकास आघाडीच्या यशात 40 टक्के वाटा हा कॉंग्रेसचा असल्याचे सांगितले जात आहे. या दावा प्रतिदाव्यामुळे राष्ट्रवादीने जिल्ह्यात मिळविलेल्या ग्रामपंचायतीतील वर्चस्वात शिवसेना, भाजप व कॉंग्रेसचा नेमका वाटा किती हा संशोधनाचा भाग आहे. 

पुणे-बंगळूर महामार्गावरील अपघातात युवती ठार; मुंढेत शाेककळा

ग्रामपंचायत निवडणुकीत जिल्ह्यात महाविकास आघाडीला 85 टक्के जनतेने पसंती दिली आहे. असेच प्रेम राष्ट्रवादी व आघाडीतील घटक पक्षांवर ठेवावे. 
- सुनील माने (जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस) 

साता-यात बर्ड फ्लू; मृत कोंबड्यांचा अहवाल पाॅझिटीव्ह

ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप पुरस्कृत पॅनेलला जनतेने मतदान करून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वावर विश्‍वास दाखविला आहे. 
- विक्रम पावसकर (जिल्हाध्यक्ष, भारतीय जनता पक्ष) 

महाबळेश्वर तालुक्यात गड आला, पण सिंह गेला; राष्ट्रवादीला धक्का, भाजपची जोरदार मुसंडी

जिल्ह्यात शिवसेने मुसंडी मारत बहुतांशी ग्रामपंचायतीत यश मिळविले आहे. हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाचा विजय आहे. शिवसेना कार्यकर्त्यांनी केलेल्या कामाला यश मिळाले असून, शिवसेना तळागाळपर्यंत पोचली आहे. 
- प्रा. नितीन बानुगडे पाटील (जिल्हा संपर्कप्रमुख, उपनेते शिवसेना, सातारा जिल्हा) 

आमदार मकरंद पाटलांच्या चर्चेनंतर महाबळेश्वर पालिकेत रंगले राजकारण

ग्रामपंचायत निवडणुकीत कॉंग्रेसला ही चांगले यश मिळाले असून, महाविकास आघाडीला 75 टक्के यश मिळाले आहे. यामध्ये 40 टक्के वाटा कॉंग्रेसचा आहे. 
- डॉ. सुरेश जाधव (जिल्हाध्यक्ष, कॉंग्रेस, सातारा जिल्हा)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET UG Result पेपरफुटीनंतर गुणांचा महाघोटाळा, अन्सर की अन् स्कोअरकार्डवर वेगवेगळे गुण; बीडच्या 2 विद्यार्थ्यांचा आक्षेप

FDA Action: तुकाराम मुंढेंची मुंबईत धाड! १० लाखांचे साबण जप्त, अन्न व औषध विभागाची मोठी कारवाई

Latest Marathi News Live Update : सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ मुंबईत CJP चे आंदोलन, कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात

Corona Virus: कोरोना परत येतोय? महाराष्ट्रात ४८ जणांना लागण; धक्कादायक माहिती समोर

Tukaram Mundhe यांच्या धाडीनंतर अकोल्यातील गुटखा कारवाईत मोठा ट्विस्ट, काय घडलं?

SCROLL FOR NEXT