सातारा

साताऱ्याच्या पालकमंत्र्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश; तातडीने पंचनामे करा

हेमंत पवार

कऱ्हाड : वादळी पावसाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी आज (साेमवार) जिल्हाधिकारी शेखर सिंह यांना दिले आहेत. सातारा जिल्ह्यात काल (रविवारी) रात्री जिल्ह्याच्या विविध भागांत विजांचा कडकडाट व वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला.

सातारा जिल्ह्यातील पिंपोड्यासह दहिगाव, वाघोली, सोनके, नांदवळ, नायगाव, करंजखोप, अनपटवाडी, राऊतवाडीत जोरदार वाऱ्याचा मोठा फटका बसला. सातत्याने जोरदार वारे वाहू लागल्याने उंच वाढलेला ऊस आडवा झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. वाऱ्याबरोबरच पाऊस असल्याने ऊस पाण्यातच पडला असल्याचे चित्र आहे. सातत्याने पाऊस सुरु राहिल्याने पडलेला ऊस कुजण्याची भिती ऊस उत्पादकांनी व्यक्त केली आहे.

नेत्यांनाे! आता हाताची घडी सोडायची वेळ आलीय

याबराेबरच माण तालुक्याच्या पुर्व भागात रविवारी रात्री मुसळधार पावसामुळे ऊसाची ऊभी पिके आडवी झाली आहेत. तसेच पावसाने अनेक ठिकाणी शेती, घरे, जनावरांची शेडचे व अन्य मालमत्तेचे नुकसान झाले आहे. त्या नुकसानीचे पंचनामे करावेत. कोणीही पंचनाम्यापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी, असे आदेश पालकमंत्र्यांनी दिला आहे.

फलटणच्या राजघराण्याने कोरोनाग्रस्तांसाठी दिला 'विक्रम-विलास' बंगला

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Supply India : LPG बाबत दोन आनंदाच्या बातम्या! 'हॉर्मुझ'मधून 34 लाख सिलिंडर्सचा साठा भारताकडे रवाना; गॅस सिलिंडर दरवाढीतही मोठा दिलासा, जाणून घ्या सविस्तर

Petrol-Diesel Rate: RBI गव्हर्नरांच्या इशाऱ्यानंतर नवे दर जाहीर; पेट्रोल-डिझेल आता किती रुपयांना?

43 व्या वर्षी ब्रेस्ट कॅन्सर, राजश्री देशपांडेनं आई वडिलांपासून महिनाभर लपवलेलं, म्हणाली...

Latest Marathi News Live Update : रुपाली चाकणकर ईडी ऑफिसमध्ये दाखल

Jasprit Bumrah: जसप्रीत बुमराह आयसीसी कसोटी गोलंदाजी अव्वल, जायसवाल और शुभमन गिल टॉप १० मध्ये

SCROLL FOR NEXT