Heavy Rain  esakal
सातारा

नागठाणेच्या पश्‍चिम भागात मेघगर्जनेसह तुफान; ताली फुटल्या, गंजी गेल्या वाहून

नागठाणेच्या पश्‍चिमेस डोंगरमाथा व पायथ्याला वसलेल्या भैरवगड, कौंदणीसह मांडवेत अक्षरशः ढगफुटीसदृश पाऊस झाला.

विकास जाधव

काशीळ (सातारा) : मांडवे (ता. सातारा) येथे काल दुपारी ढगफुटीसदृश पाऊस (Heavy Rain) झाला. अचानक आलेल्या या पावसाने परिसरात पाणीच पाणी होऊन शेतीसह रस्ते, विहिरीचे नुकसान झाले आहे. नागठाणे परिसरातील सर्व गावांमधून काल दुपारी पूर्वमोसमी पावसाला जोरदार सुरवात झाली. विजेच्या कडकडाटात व मेघगर्जनेसह तुफान पावसाने परिसराला अक्षरशः झोडपून काढले. (Heavy Rain In The Western Area Of Nagthane Mandave Satara News)

यावेळी नागठाणेच्या पश्‍चिमेस (Western Area Of Nagthane) डोंगरमाथा व पायथ्याला वसलेल्या भैरवगड, कौंदणीसह मांडवे गावात अक्षरशः ढगफुटीसदृश पाऊस झाला. तेथे पडलेल्या तुफान पावसाने क्षणार्धात ओढे-नाले दुथडी भरून वाहू लागले. शेतात पाणी साचल्याने बांध व ताली फुटून गेल्या. गाराही पडल्याने आंब्याच्या बागांचे मोठे नुकसान झाले. जनावरांच्या चाऱ्यासाठी कडब्याच्या गंजी वाहून गेल्या. दुथडी भरून वाहणाऱ्या ओढ्यांचे पाणी विहिरीत गेल्याने विहिरीही भरून गेल्या. यावेळी पाणी घरात घुसल्याने अनेक ग्रामस्थांचे प्रापंचिक साहित्य भिजल्याने मोठे नुकसान झाले. सुमारे दीड तास या परिसराला तुफान पावसाने झोडपले.

मांडवे गावालगत डोंगरउंचावर असलेल्या कौंदणी गावालाही वादळी पावसाचा तडाखा बसला. दुपारी सुरू झालेला वादळी पाऊस रात्री उशिरापर्यंत सुरू होता. त्यात काही ठिकाणी जमीन खचली. रस्त्याकडेला नाले नसल्यामुळे सर्व पाणी रस्त्यावर आल्याने अनेक ठिकाणी नुकसान झाले. रामचंद्र बोरगे, जोतिराम यादव, सीताराम यादव, प्रकाश यादव आदी शेतकऱ्यांच्या घरात पाणी घुसल्यामुळे जीवनावश्‍यक वस्तूंची मोठी हानी झाली. जगन्नाथ यादव यांच्या विहिरीचेही पावसात मोठे नुकसान झाले. काशीळ, अतित परिसरातही वादळी वारे, विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडला आहे. वीज खंडित झाल्याने ग्रामस्थांना रात्रभर अंधारात राहावे लागले. वीज खंडित होण्यामुळे कृत्रिम पाणीटंचाईला सामोरे जावे लागले.

Heavy Rain In The Western Area Of Nagthane Mandave Satara News

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबईत पीएम मोदींच्या कार्यक्रमापूर्वी सुरक्षेत मोठी त्रुटी! बंदूकधारी अन् बनावट PMO अधिकाऱ्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

नावही माहिती नसलेल्या खेळांचे बोगस प्रमाणपत्र! वर्ग १ आणि वर्ग २च्या नोकऱ्या मिळवल्या; दोघे अटकेत, एक हजार सर्टिफिकेट वाटल्याचा दावा

Duleep Trophy: शमी-मुकेशच्या माऱ्यासमोर दक्षिण विभागाची दाणादाण; पण पडिक्कल पाठोपाठ तिलक वर्माची झुंज, ठोकली तिसरी फिफ्टी

Marathi News Live Updates : मिरवणूक बंदीकडे चाललेली पावले थांबली नाहीत तर भविष्यात उत्सवच बंद होतील - साऊंड असोसिएशन

VIDEO: फार्महाऊसवर बिबट्याची एन्ट्री, मनसेच्या नेत्याचा पाळीव कुत्रा 'रॉकी'ची थरारक झुंज; घटना CCTVत कैद

SCROLL FOR NEXT