सातारा

मुसळधार पावसाने पाटणला झोडपले

जालिंदर सत्रे

पाटण (जि. सातारा) : परतीच्या मुसळधार पावसाने तालुक्‍याला शुक्रवारी झोडपले. दुपारी दोन वाजता अचानक पावसास सुरवात झाल्याने खरिपाच्या काढणीत व्यत्यय आला. काढलेली सोयाबीन व भाताची पिके शेतातच भिजली. अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची मात्र तारांबळ उडाली. 

गेल्या 15 दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे. तालुक्‍याच्या पूर्व सीमेपर्यंत परतीच्या पावसाने हजेरी लावली. मात्र, काही गावांचा अपवाद सोडला तर परतीचा पाऊस तालुक्‍यात पडलेला नव्हता. सलग 15 दिवस पाऊस नसल्याने वातावरणात उष्णता वाढली होती. दररोज पावसाचे वातावरण तयार व्हायचे. मात्र, पाऊस पडायचा नाही, अशी परिस्थिती होती. 
शुक्रवारी दुपारी दोन वाजता अचानक पावसास सुरुवात झाली. एक तास मुसळधार पाऊस पडला, त्यामुळे सगळीकडे पाणीच पाणी झाले. आटलेले ओढे-नाले भरून वाहू लागले. खरिपाच्या काढणीस सुरवात झाली असून सोयाबीन व भात काढणीस व काही गावात भुईमुगाच्या काढणीस वेग आला होता. शेतकऱ्यांनी भात व सोयाबीनची कापणी केली होती. कापणी केलेल्या भाताची झोडणी तर सोयाबीन एकत्र करून बुचाड लावण्याचे काम सुरू होते. अचानक आलेल्या पावसाने काढलेली पिके भिजली. शेतात पाणी झाल्याने मजूर अर्ध्या दिवसातच सोडावे लागले. पावसामुळे काढणी केलेल्या पिकाचे नुकसान झाले. 

जादा कालावधीच्या पिकांना जीवदान 

जादा कालावधीच्या भात पिकांसाठी व भुईमुगाची काढणीसाठी हा पाऊस उपयुक्त आहे. भुईमुगाची काढणी करताना शेतात ओल नसल्याने शेंगा जमिनीत राहात होत्या, तर वेल हातात येत होते. काढणीस आलेल्या पिकांचे नुकसान करणारा तर जादा कालावधीच्या पिकांना जीवदान देणारा पडलेला पाऊस आहे. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Traffic advisory : मुंबईत PM नरेंद्र मोदींची जाहीर सभा; गर्दी टाळण्यासाठी वाहतुकीत मोठे बदल, जाणून घ्या पर्यायी मार्ग

Cotton Seeds : पहिल्याच दिवशी कपाशी बियाण्यांचा अत्यल्प पुरवठा; आजपासून कापूस बियाणे विक्रीचा होता मुहूर्त

MS Dhoni: धोनी RCB ला देणार सरप्राईज? CSK ने शेअर केलेल्या त्या व्हिडिओने चर्चांना सुरुवात

Share Market Today: अमेरिकन बाजार विक्रमी उच्चांकावरून कोसळले; भारतीय शेअर बाजारात कशी असेल स्थिती?

Devendra Fadnavis: "सिंचन घोटाळ्याप्रकरणी आरोप चुकीचे नव्हते, तेव्हा..."; देवेंद्र फडणवीसांनी मनातलं बोलून दाखवलं

SCROLL FOR NEXT