सातारा

कोयना धरणाचा पाणीसाठा तब्बल आठ टीएमसीने वाढला, 73 वर पाेचताच दरवाजे उघडणार ?

विजय लाड

काेयनानगर (जि.सातारा) : कोयना धरण पाणलोट क्षेत्रात सर्वदूर ठिकाणी धो-धो पाऊस पडत आहे. गेल्या चाेवीस  तासात पाणलोट क्षेत्रात झालेल्या रेकॉर्ड ब्रेक पावसाने कोयना धरणाच्या पाणीसाठय़ात तब्बल आठ टीएमसीने वाढ झाली आहे. धरणात आज (बुधवार) 60.18 टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे. कोयना धरणातील पाणीसाठय़ाने भरतीकडे प्रयाण केले असून पाणलोट क्षेत्रात सर्वदूर ठिकाणी पावसाचा जोर असाच कायम राहिला तर लवकरच कोयना धरणाची जल पातळी नियंत्रित करण्यासाठी कोयना धरणाचे दरवाजे उघडावे लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी 'या' निर्णयाचा फेरविचार करावा

दाेन ऑगस्ट पासून मुसळधार पावसाचे आगार असणाऱ्या कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार पडत आहे. मुसळधार पावसाच्या सरीवर सरी पाणलोट क्षेत्रात कोसळत आहेत. गेल्या चोवीस तासात पाणलोट क्षेत्रात मुसळधार पडणाऱ्या पावसाचा जोर दुप्पट झाला आहे. पाणलोट क्षेत्रातील कोयनानगर येथे 238 मिली मीटर नवजा येथे 299 मिली मीटर तर महाबळेश्वर येथे 308 मिली मीटर, वलवण या ठिकाणी 239 मिली मीटर अशी रेकॉर्ड ब्रेक पावसाची नोंद झाली आहे. 

धाडसी निर्णय..! आता कोरोना रुग्णांवर घरच्या घरी उपचार, सातारकरांनाे अटी वाचा

काेयना धरणाची जलपातळी 2118.11 फूट झाली असून धरणात 60.28 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. कोयना धरणात 73 टीएमसी पाणीसाठा झाल्यावर धरणाची जलपातळी नियंत्रित करण्यात येणार आहे. कोयना प्रकल्पाचे मुख्य अभियंता यांनी यावर्षी कोयना धरणाची परी चालन सूची मंजूर केली आहे. पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर असाच कायम राहिला तर लवकरच धरणाचे दरवाजे उघडण्याची शक्यता आहे.

गृहराज्यमंत्री म्हणाले... सरकार स्थापन झालं अन्‌ नशिबी कोविड आलं

दरम्यान मे महिन्यात कोयना धरणाची पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी शेखर सिंह हे कोयनानगर येथे आले होते. यावेळी प्रकल्पाचे अधिक्षक अभियंता संजय डोईफोडे यांनी धरणात 2133.00 फूट ,73 टीएमसी पाणीसाठा झाल्यावर प्रकल्पाचे मुख्य अभियंता यांनी परीचालन सूचीला मान्यता दिली असल्याचे स्पष्ट केले होते. यामुळे धरणाच्या सहा वक्री दरवाज्याला पाणी टेकल्यावर हा प्रयोग होण्याची शक्यता आहे.

Mumbai Rain Updates: मुंबईसह उपनगरात रेड अलर्ट जारी, पालघरमध्ये NDRFची टीम तैनात 

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MSP hike 2026: मोदी सरकारचा शेतकऱ्यांसाठी मास्टरस्ट्रोक! १४ खरीप पिकांच्या MSP मध्ये वाढ, कापूस-सूर्यफूल उत्पादकांना मोठा फायदा!

IPL 2026 : चेन्नईच्या ताफ्यात दाखल झालेला Macneil Hadley Noronha कोण? UAEत बालपण; DC, KKR, MI साठी दिलेलं ट्रायल...

Mumbai: मुंबईकरांच्या स्वयंपाकघरावर महागाईचा तडाखा! भाजीपाल्याचे भाव वाढले; जाणून घ्या सध्याचे दर...

Latest Marathi News Live Update : तिरुवनंतपुरम जिल्हा क्रीडा परिषदेच्या कार्यालयात एसीचा स्फोट, २ जखमी

SC on Hinduism: श्रद्धा सिद्ध करण्यासाठी मंदिरात जाण्याची गरज नाही, हिंदू धर्माबद्दल सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वाचे निरीक्षण

SCROLL FOR NEXT