Hotel The Fern at Panchgani esakal
सातारा

Hotel The Fern : 'हॉटेल फर्न'ला उच्च न्यायालयाचा मोठा दणका; 'इतक्या' लाखांचा ठोठावला दंड, काय आहे प्रकरण?

पाचगणी येथील प्लॉट नंबर ५५५ या मिळकतीत बांधलेली इमारत ही रहिवासासाठी बांधण्यात आली होती.

सकाळ डिजिटल टीम

उच्च न्यायालयाच्या या निर्णयाचा पाचगणी- महाबळेश्वरमधील अनेक व्यावसायिकांनी धसका घेतला असून, अशा इमारती वापरकर्त्यांवर आता नगरपालिका लक्ष करणार काय? याचीच चर्चा सर्वत्र सुरू आहे.

पाचगणी : पाचगणी येथील हॉटेल द फर्नवर (Hotel The Fern at Panchgani) पालिकेच्या वतीने सील लावण्यात आले होते. या कारवाईच्या विरोध उच्च न्यायालयात (High Court) आव्हान देण्यात आले होते. न्यायालयाच्या वतीने ही याचिका फेटाळून हॉटेल प्रशासनाला दहा लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.

याबाबत पाचगणी नगरपालिकेचे (Panchgani Municipality) मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, पाचगणी येथील प्लॉट नंबर ५५५ या मिळकतीत बांधलेली इमारत ही रहिवासासाठी बांधण्यात आली होती; परंतु या इमारतीचा हॉटेल द फर्नकडून व्यवसायासाठी वापर केला जात होता. दरम्यान, नगरपालिका प्रशासनाच्या वतीने कारवाई करत मे महिन्यामध्ये सील करण्यात आली होती.

पालिकेच्या या कारवाईच्या विरोधात चांदणी रियाल्टी यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. न्यायालयाने ती फेटाळताना मुख्य इमारतीच्या टेरेसवरील विनापरवाना शेड तीन महिन्यांचे आत काढून घ्यावे, तसेच इमारतीचा वापर मंजूर नकाशात दाखविल्याप्रमाणे स्लोपिंग रूफ करावे. त्याचबरोबर मागील बाजूला असणारी सर्व्हे नंबर १४/ए/२ चे मिळकतीचे सीलबंद कायम राहणार आहे; परंतु मुख्य इमारतीचे सील काढताना सदर इमारत वापर हा फक्त रहिवासासाठीच करणे बंधनकारक राहील.

याचिकाकर्त्याने ब्रेड ॲण्ड बटरचे महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाचे दोन रूमचे लायसन काढून तब्बल ७० रूमच्या माध्यमातून व्यावसायिक वापर केला. यामुळे उच्च न्यायालयाने दहा लाख रुपयांचा निधी कीर्तिकर लॉ लायब्ररीसाठी दोन आठवड्यांत जमा करावेत. असे आदेश पारित करण्यात आल्याचे मुख्याधिकारी जाधव यांनी सांगितले. उच्च न्यायालयाच्या या निर्णयाचा पाचगणी- महाबळेश्वरमधील अनेक व्यावसायिकांनी धसका घेतला असून, अशा इमारती वापरकर्त्यांवर आता नगरपालिका लक्ष करणार काय? याचीच चर्चा सर्वत्र सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: कुत्रा भुंकल्याने वाद पेटला; वाघोलीत दोन बहिणींवर दगड, सळई अन् लाथाबुक्क्यांनी हल्ला

Premium|Mithu Sen Artist : भाषा आणि रूढींना बगल देणारी कलावंत...

Pune Family Crime News : आईला बाहेर पाठवलं, ‘आधारकार्ड आणतो’ म्हणत घरी आला; मामाचा खून करून भाच्याची आत्महत्या

Sex Racket Busted : वाराणसीत खानावळ-बस बुकिंगच्या आडून 'कोडवर्ड' द्वारे सुरु होता वेश्याव्यवसाय; गेस्ट हाऊसवर छापा, ४ महिलांसह ७ जण ताब्यात

ICAI Global Expansion : जगातील ५० देशांत आयसीएआयचे जाळे निर्माण करण्याचे उद्दिष्ट आयसीएआयच्या राष्ट्रीय परिषदेत माहिती

SCROLL FOR NEXT