सातारा

कोयना धरणातील पाणीसाठ्याचे शतक; पायथा वीज गृह कार्यान्वित

विजय लाड

कोयनानगर (जि. सातारा) : धरण पाणलोट क्षेत्रात गेल्या पाच दिवसापासून उसंत घेतलेल्या पावसाने दमदार कमबँक केले. यामुळे शतकाच्या उंबरठ्यावर असणाऱ्या कोयना धरणातील पाणीसाठ्याने शतक ओलांडले आहे. पाणलोट क्षेत्रात पाऊस असून धरणाचे दरवाजे व पायथा वीज गृह बंद आहेत. धरणाची जलपातळी वाढत असल्याने कोयना धरण प्रशासनाने रविवारी (ता. ३०) सकाळी आठ वाजल्यापासून कोयना धरणातून पाणी सोडण्याचे चालू केले आहे. धरणाचा पायथा वीज गृह कार्यान्वित करून त्यातून नदीपात्रात 2100 क्यूसेक पाण्याचा विसर्ग चालू केल्याची माहिती कोयना सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता कुमार पाटील यांनी दिली आहे. 

दरम्यान, कोयना धरणात 100 टीएमसी पाणीसाठा झाल्यामुळे सोमवारी (ता. ३०) कोयना धरणातील पाणीसाठ्याचे जलपूजन गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते होणार आहे. गत २४ तासात धरण पाणलोट क्षेत्रातील कोयनानगर येथे 25 मिलीमीटर, नवजा 49 मिलीमीटर तर महाबळेश्वर येथे 65 मिलीमीटर पावसाची नोंद झाल्यामुळे धरणात येणाऱ्या पाण्याची आवक 15,325 क्यूसेक इतकी झाल्याने धरणाची जलपातळी 2159.10 फूट झाली असून धरणात 100.49 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. 

पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस सुरु असून धरणाच्या जलपातळीत वाढ होत आहे. जलपातळी नियंत्रित करण्यासाठी धरणाचा पायथा वीज गृह पुन्हा एकदा कार्यान्वीत करण्यात आला आहे. धरणातून नदीपात्रात 2,100 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सोडण्यात येत आहे. कोयना धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी केवळ पाच टीएमसी पाणीसाठ्याची गरज असून धरणातील पाणीसाठ्याने शंभर टीएमसी ही मॅजिक फिगर ओलांडल्यामुळे कोयना प्रशासनाने धरणातील पाणीसाठ्याच्या जलपूजनाचा कार्यक्रम उद्या सोमवारी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते आयोजित केल्याचे कोयना सिंचनचे कार्यकारी अभियंता पाटील यांनी सांगितले.

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT