Shivendraraje Bhosale esakal
सातारा

Deepak Pawar : भाजप आमदार शिवेंद्रराजेंना पाडूनच मी रिटायरमेंट घेणार; राष्ट्रवादीच्या पवारांचा थेट इशारा

मध्यंतरी विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या सभेमुळे राष्ट्रवादीत चैतन्य निर्माण झाले आहे.

सकाळ डिजिटल टीम

शशिकांत शिंदे हेही राष्ट्रवादीचे आमदार आहेत. ते महाविकास आघाडीचे नेते असल्याने तेही पालिकेच्या निवडणुकीत आमच्यासोबत असणार आहेत, असेही त्यांनी सांगितले.

सातारा : जावळी तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांच्या उपस्थितीत शेतकरी मेळावा व जाहीर सभा ७ जूनला सकाळी ११ वाजता कुडाळ येथे बाजार समितीच्या मैदानावर होणार आहे. या सभेत तालुक्यातील समस्या व प्रश्‍न मांडणार असून, यानिमित्ताने राष्ट्रवादीचे कार्यकर्ते चार्ज होणार आहेत, अशी माहिती राष्ट्रवादीचे जावळीतील नेते दीपक पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.

आगामी विधानसभेसाठी आमची ही बांधणी असून, आमदार शिवेंद्रसिंहराजेंना (Shivendraraje Bhosale) पाडूनच मी रिटायरमेंट घेणार असल्याचे त्यांनी नमूद केले. राष्ट्रवादी भवनात पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. दीपक पवार म्हणाले, ‘मध्यंतरी मी राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांची सिल्वर ओक या निवासस्थानी भेट घेऊन जावळी तालुक्यात मेळाव्यासाठी येण्याची विनंती केली होती. त्यानुसार त्यांनी ७ जून ही तारीख दिली आहे. श्री. पवार यांच्या उपस्थितीत ७ जूनला राष्ट्रवादीचा शेतकरी मेळावा व जाहीर सभा होणार आहे.'

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी जावळीतून आम्ही या माध्यमातून बांधणी करत आहोत. मध्यंतरी विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या सभेमुळे राष्ट्रवादीत चैतन्य निर्माण झाले आहे. आता शरद पवारांची सभा झाल्यावर कार्यकर्ते चार्ज होतील. आगामी विधानसभेची निवडणूक आपण सातारा- जावळी मतदारसंघातून लढणार असून, आमदार शिवेंद्रसिंहराजेंना पाडूनच मी रिटायरमेंट घेणार आहे, असंही त्यांनी (Deepak Pawar) स्पष्ट केलं.

जावळी, महाबळेश्‍वर बाजार समितीत आमचा पराभव झाला असला तरी आम्ही विरोधाला विरोध केल्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होऊ शकली नाही; पण पक्षाच्या दोन आमदारांनी भाजपच्या आमदाराशी केलेली युती याची पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी नोंद घेतली आहे. त्यावर ते योग्य निर्णय घेतील. सातारा पालिकेची निवडणूक महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढली जाणार आहे. त्याच अनुषंगाने शिवसेनेच्या ठाकरे गटाचे उपनेते प्रा. नितीन बानुगडे-पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव यांच्यासमवेत आमच्या दोन बैठका झालेल्या आहेत. आणखी बैठका होणार असून, जागा वाटपावर चर्चा होणार आहे, असंही पवार म्हणाले.

शशिकांत शिंदे हेही राष्ट्रवादीचे आमदार आहेत. ते महाविकास आघाडीचे नेते असल्याने तेही पालिकेच्या निवडणुकीत आमच्यासोबत असणार आहेत, असेही त्यांनी सांगितले. जावळी तालुक्यात राष्ट्रवादीला चांगले वातावरण असून, कार्यकर्त्यांना चार्ज करण्यासाठी खासदार शरद पवार यांची ही सभा होणार आहे. या वेळी भानुदास भोसले, दादा रासकर, मारुती महामुलकर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. वसंतराव मानकुमरे कुठे आहेत, असे विचारले असता दीपक पवार म्हणाले, ‘सध्या ते शिवेंद्रसिंहराजे यांच्यासमवेत असतात. ते त्यांचे दूत आहेत. ते कोणत्याच पक्षात नाहीत.’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Independence Day Live Update : लाल किल्ल्यावर यंदा प्रथमच वंदे मातरम्, पंतप्रधान मोदींचे सलग तेराव्यांदा ध्वजारोहण

शहर हद्दीतही दोन्ही बाजूला ३० मीटरचेच बंधन! महामार्गांलगतच्या हॉटेल, ढाब्यांवर ६० दिवसांत हातोडा; जिल्हाधिकाऱ्यांकडून ‘कृती दल’ स्थापन, वाचा...

Tricolor Cheese Toast Recipe: या स्वातंत्र्यदिनाला नाश्त्यात करा काहीतरी हटके! १० मिनिटांत बनवा चीजने भरलेला ‘तिरंगा टोस्ट’

Career Horoscope: सरकारी नोकरीत मिळवतात यश; ‘या’ राशींना मिळते नशिबाची साथ, करिअरमध्ये करतात मोठी प्रगती, तुमची रास कोणती?

Weekly Rashi Bhavishya Horoscope News in Marathi : कसा असेल तुमचा आठवडा..? ग्रहमान : १५ ऑगस्ट २०२६ ते २१ ऑगस्ट २०२६ - मराठी राशी भविष्य

SCROLL FOR NEXT