सातारा

छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीचे उद्या राजमाता कल्पनाराजे भोसले यांच्या हस्ते लोकार्पण

उमेश बांबरे

सातारा : संगम माहुली येथील राजघाटावरील छत्रपती शाहू महाराज (थोरले) यांच्या समाधीचा जीर्णोद्धार करण्यात आला असून या समाधीचा लोकार्पण सोहळा मंगळवारी (ता. 15) सकाळी दहा वाजता कृष्णा-वेण्णा नद्यांच्या संगमावर होणार आहे. या पार्श्‍वभूमीवर राजमाता कल्पनाराजे भोसले यांनी रविवारी समाधीच्या परिसराची पाहणी केली.

छत्रपती शिवाजी महाराजांचे नातू तसेच छत्रपती संभाजी महाराजांचे पुत्र छत्रपती शाहू महाराज (थोरले) यांचे 15 डिसेंबर 1749 रोजी सातारा शहरातील रंगमहाल-राजवाडा येथे निधन झाले. दक्षिण काशी समजल्या जाणाऱ्या संगम माहुली येथील राजघाटावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. तेथेच त्यांचे समाधीस्थळ उभारण्यात आले.

जिल्ह्यात सद्य:स्थितीत लॉकडाउनचा कोणताही विचार नाही : शेखर सिंह

राजमाता कल्पनाराजे यांच्या मार्गदर्शनाखाली ऑक्‍टोबर 2018 मध्ये या समाधीस्थळाच्या जीर्णोध्दाराचे काम लोकसहभागातून हाती घेण्यात आले होते. अवघ्या 25 महिन्यांत हे काम पूर्ण करण्यात आले आहे. मंगळवारी छत्रपती शाहू (थोरले) महाराजांची 270 वी पुण्यतिथी असून याच दिवशी सकाळी दहा वाजता राजमाता कल्पनाराजेंच्या हस्ते समाधीचे लोकार्पण होणार आहे. राजमातांनी रविवारी या समाधीच्या पूर्ण झालेल्या कामाची पाहणी केली. तसेच कामांबाबत काही सूचनाही केल्या.

पर्वतारोहण संघटनेच्या कार्यकारिणीत आशिष माने, सुनील भाटिया, ऍड. शार्दुल टोपेंचा समावेश

या परिसरात महाराणी ताराराणी व येसूबाई यांच्या समाधी आहेत. या समाधींचाही जीर्णोध्दार करून त्यांचेही लोकार्पण केले जाणार आहे. त्यासाठी आराखडा तयार करून या समाधींचेही काम हाती घेतले जाणार आहे. त्याबाबत राजमातांनी काही महत्त्वपूर्ण सूचना केल्या. यावेळी अजय जाधवराव, राजू राजपुरोहित, शशिकांत पवार, रोहित सावंत, विनित पाटील, पंकज चव्हाण आदी उपस्थित होते.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : मुंबईत दुसऱ्या दिवशीही मुसळधार पाऊस सुरुच, रायगड, पालघरमध्ये शाळांना सुट्टी; रेड अलर्ट जारी, पुढील ४ दिवस धोक्याचे

पोलिस उपायुक्तांचे आदेश! ट्रॅफिक पोलिस नेमलेल्या ठिकाणीच असणे बंधनकारक; ‘HSRP’ नंबरप्लेट नसलेल्या वाहनांवर ‘आरटीओ’ करणार कारवाई; रिक्षा चालकांना ड्रेसकोडचे बंधन

चोरीचे दागिने घेणारा सराफही आरोपी! पावतीशिवाय दागिने घेतल्यास पोलिसांकडून कारवाई; ‘या’ कलमाखाली 3 वर्षांपर्यंत कारावास अन्‌ दंडाची शिक्षा, वाचा...

जिल्हा परिषदेच्या भन्नाट योजना! महिलांना शिलाई मशीन, पिठाची गिरणी; सातवी ते बारावीतील मुलींना सायकली, टॅली, MS-CIT, कराटे प्रशिक्षण, गरीब मुलांना पैसेही

Best Banana French Toast: बिझी मॉर्निंगसाठी बेस्ट! 10 मिनिटांत बनवा बनाना फ्रेंच टोस्ट; लिहून घ्या सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT