सातारा

'या'मुळे शेतकरी नाराज आहेत, 'बळिराजा' चे शरद पवारांना निवेदन

हेमंत पवार

कऱ्हाड : गाईच्या दुधाला 30 रुपये दर द्यावा, दुधाला 10 रुपये थेट अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावे आणि साखर कारखान्यांकडून थकीत एफआरपी शेतकऱ्यांना तत्काळ मिळावी, असे साकडे बळिराजा शेतकरी संघटनेचे पश्‍चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख साजिद मुल्ला यांनी निवेदनाव्दारे माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांना घातले.
दुधाचे करायचे काय...ते मारताहेत टाहाे
 
ज्येष्ठ नेते पवार नुकतेच कऱ्हाडच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी श्री. मुल्ला यांनी त्यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन देऊन चर्चा केली. निवेदनातील माहिती अशी, शेतकऱ्यांचा घरखर्च दुधावर चालतो. परंतु, लॉकडाउनच्या काळात दुधाचे दर मोठ्या प्रमाणात ढासळले आहेत. गाळप हंगाम संपून दुसऱ्या गळीत हंगामाची तयारी साखर कारखान्यांनी चालू केली आहे. परंतु, अद्यापही काही कारखान्यांनी पूर्ण एफआरपी दिलेली नाही. त्यामुळे राहिलेली एफआरपीची रक्कम शेतकऱ्यांना तत्काळ मिळावी.

'या' सहकारी संस्थांना चिंता, 54 कोटी 40 लाख रुपये कसे परत मिळणार ?

राजेश टाेपेंची सिव्हिलला क्लिन चीट; डॉ. अमोद गडीकरांची गच्छंती

खाद्याचे दर भरमसाट वाढले आहेत. परंतु, दुधाचे दर ढासळले आहेत. पाण्याची बाटली 20 रुपये, तर दुधाचा दर 18 रुपये लिटर आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनात प्रचंड नाराजी आहे. त्यामुळे गाईच्या दुधाला 30 रुपये दर मिळावा व दहा रुपये अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात थेट जमा करावे. याची अंमलबजावणी तत्काळ करावी, अन्यथा बळिराजा शेतकरी संघटना शेतकऱ्यांना सोबत घेऊन महाराष्ट्रभर आंदोलन करेल, असे निवेदन देण्यात आले. या वेळी कामगार नेते अनिल घराळ, शेतकरी उपस्थित होते.

Edited By : Siddharth Latkar

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT