सातारा

भाजपला धक्का देत 'पवार' पुन्हा राष्ट्रवादीत, खटाव तालुक्‍यात 'पावर' वाढणार!

हेमंत पवार

कऱ्हाड (जि. सातारा) : सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वावर असलेला विश्वास आणि केलेली विकासकामे याचा विचार करून मंत्री पाटील यांच्या उपस्थितीत जितेंद्र पवार यांनी पुन्हा हातात घड्याळ बांधून राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. 

जिल्हा परिषदेचे माजी सदस्य पवार यांनी 2017 मध्ये पुसेसावळी जिल्हा परिषद गटात पक्षाने जिल्हा परिषद, पंचायत समितीचे तिकीट न मिळाल्याने नाराज होऊन बंडखोरीचे निशाण हाती घेतले. अटीतटीच्या लढतीत त्यांना पराभव पत्करावा लागला असला, तरी अपक्ष उमेदवारी करून तब्बल सहा हजार मते मिळवली होती. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीनंतर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षावर नाराज असलेल्या पवार यांना भाजपने पक्षात घेतले. जानेवारी 2020 मध्ये हरणाई सूतगिरणीवर आलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी त्यांची भेट झाली. तेव्हापासून ते राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याची खटाव तालुक्‍यात चर्चा सुरू होती. 

सहकारमंत्री पाटील यांनीही मतदारसंघ मजबूत करण्याकडे लक्ष दिले आहे. मंत्री पाटील यांच्या उपस्थितीत त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला. जोतिराम थोरात, भाऊसाहेब लादे, शिवाजी शिंदे, महादेव माने, पांडुरंग माने, श्रीमंत कदम, साधू मगर, बजरंग पवार, बापूराव माने, निवास पवार, धोंडीराम जगताप, श्री. मदने गुरुजी, दादासाहेब कदम, धनाजी पाटील, दिलीप यादव, दिनकर पाटील, सुदाम पिसाळ, दाऊद पटेल, तुषार माने, सचिन माने, अविनाश घार्गे, विजय पिसाळ, दादासाहेब दगडे, प्रताप शिंदे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Metro Tragedy: मेट्रो स्लॅब कोसळल्याने ठाणे–मुंबई वाहतूक ठप्प, एकाचा मृत्यू; 3 ते 4 जखमी

Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावर मृत्यूचे तांडव! टँकरला भीषण आग, चालक जळून खाक

Devgad Hapus : देवगड हापूसचा मोहोर काही दिवसांत काळवंडला; हवामान बदल की अज्ञात संकटाने बागायतदारांच्या आशा हिरावल्या?

Somvati Amavasya 2026: यंदा सोमवती अमावस्या कधी आहे? जाणून घ्या योग्य तारीख, शुभ मुहूर्त आणि पूजा विधी

Mumbai: मुलुंडमध्ये मोठी दुर्घटना! मेट्रोचा स्लॅब कोसळला; एकाचा मृत्यू, 3 ते 4 जखमी; तर अनेकजण अडकल्याची भीती

SCROLL FOR NEXT