Mahesh Shinde
Mahesh Shinde esakal
सातारा

कोरोनाविरुद्धची लढाई एकट्या प्रशासनाची नसून समाजातील प्रत्येकाची आहे : आमदार शिंदे

राजेंद्र शिंदे

खटाव (सातारा) : कोरोनाविरुद्धचा (Coronavirus) लढा बहीण डॉ. अरुणा बर्गे यांना बरोबर घेऊन सुरू केला. त्यात आर्थिक भार सोसावा लागला. मात्र, मी व माझ्या कुटुंबाने रुग्णांसाठी तन, मन व धनाने वाहून घेतल्याचे दिसताच या लढ्यात मला शिलेदार मिळत गेले. कोरेगाव मतदारसंघातील कोरोनाविरुद्धच्या लढाईला आज लोकचळवळीचे स्वरूप आल्याचे धाडसाने उचलेले पाऊल सार्थकी लागल्याची भावना आमदार महेश शिंदे (Mahesh Shinde) यांनी व्यक्त केली. (Kadsiddheshwar Covid Center Started At Koregaon Hospital Satara News)

आमदार शिंदे म्हणाले, "कोरोनाविरुद्धची लढाई एकट्या प्रशासनाची नसून समाजातील प्रत्येकाची आहे, असे समजून सहभागी झाले पाहिजे. लोक ऐकतात फक्त आपण त्यांच्या विश्वासाला पात्र झाले पाहिजे म्हणूनच पुन्हा एकदा कोरेगावातील जिल्हा उपरुग्णालयाच्या इमारतीत आपण काडसिद्धेश्वर कोविड सेंटर सुरू केले. आज 110 रुग्णांना तेथे सेवा देण्यात येत आहे.'' या कामात सुरवातीला बहीण डॉ. अरुणा, पत्नी डॉ. प्रिया, दोन भाचे, डॉ. रेणू व स्वतः मी रुग्णांची सेवा करू लागलो.

आमदार शिंदे म्हणाले, ""हळूहळू या लढ्यात कुटुंबीयांबरोबरच सहकारीही आपल्या परीने योगदान देण्यासाठी पुढे आले. उपजिल्हा रुग्णालयाच्या इमारतीमध्ये नव्याने सुरू केलेले सेंटर मी स्वखर्चाने पायाभूत सुविधांनी अद्ययावत केले; पण आता शिलेदारांनी सूत्र हाती घेतल्याचे दिसून येते. या कामात लागत असलेले मनुष्यबळ व आर्थिक ताकद ओळखून कार्यकर्ते स्वेच्छेने त्यामध्ये सहभागी होऊ लागले. हळूहळू आता एक एक माणूस या महायज्ञात स्वतःला झोकू देऊ लागल्याने आमची ताकद वाढू लागली आहे. या कामाला अनेक स्वयंसेवकांमुळे लोकचळवळीचे रूप आले आहे. हॉटस्पॉट गावातील स्वयंसेवकांनी ऑक्‍सिमीटर घेऊन कोंबिग ऑपरेशनचे काम हाती घेतले आहे. सौम्य लक्षणे असणाऱ्यांवर औषधे पुरवण्यात येत आहेत. रुग्णांना जेवण बनवण्याचे कामही सहकाऱ्यांनी सुरू केले आहे. या जेवणासाठी अनेक जण गहू, तांदूळ, तेल, साखर, डाळ व भाजीपाला देऊ लागलेत. सकाळचा नाष्टा व फळे, संध्याकाळचा चहा व रात्रीचे दूध पुरवण्याची जबाबदारी काही सहकाऱ्यांनी वाटून घेतली आहे.''

माझ्या व माझ्या कुटुंबापासून सुरू केलेल्या या लढ्याला लोकचळवळीचे स्वरूप आल्याचे पाहून समाधान वाटते. त्यामध्ये जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार व इतर प्रशासकीय अधिकाऱ्यांचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले आहे.

-महेश शिंदे, आमदार

Kadsiddheshwar Covid Center Started At Koregaon Hospital Satara News

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT