सातारा

साताऱ्यात मोठी राजकीय घडामोड, कराड शेती उत्पन्न बाजार समितीचे सभापती विजयकुमार कदमांनी दिला राजीनामा

Satara latest News Update: कराड बाजार समिती ही पश्चिम महाराष्ट्रातील आर्थिकदृष्ट्या मोठी उत्पन्न असणारी बाजार समिती आहे.

हेमंत पवार -सकाळ वृत्तसेवा

Karhad News: कराड शेती उत्पन्न बाजार समितीचे सभापती विजयकुमार कदम यांनी शनिवारी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत सभापती पदाचा राजीनामा दिला आहे. सहकार उपनिबंधक यांच्या मंजुरीनंतर राजीनामा अंतिम होऊन नव्या सभापती ची निवड करण्यात येणार आहे. दरम्यान नवीन सभापती पदासाठी कोणाला संधी मिळणार याकडे सातारा जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

कराड बाजार समिती ही पश्चिम महाराष्ट्रातील आर्थिकदृष्ट्या मोठी उत्पन्न असणारी बाजार समिती आहे. या बाजार समितीत गुळ व अन्य शेतमालांची मोठी आर्थिक उलाढाल होते.

कराड शेती उत्पन्न बाजार समितीची निवडणूक मागील वर्षी मोठ्या चुरशीने झाली. बाजार समितीतील सत्ताधारी एडवोकेट उदयसिंह पाटील उंडाळकर यांच्या सत्तेला सुरुंग लावण्यासाठी माजी सहकार मंत्री आमदार बाळासाहेब पाटील व भाजपचे सातारा लोकसभा प्रभारी अतुल भोसले यांनी एकत्र येत त्यांच्या विरोधात पॅनेल टाकले होते. बाजार समितीच्या निवडणुकीत एडवोकेट उदयसिंह पाटील उंडाळकर यांना माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी खंबीर साथ दिली व त्यांच्या पाठीमागे ते उभे राहिले. त्याचबरोबर कराड उत्तर मधील आमदार पाटील यांचे विरोधक असलेले भाजपचे सातारा जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, युवा नेते मनोज घोरपडे, रामकृष्ण वेताळ यांनी एडवोकेट उदयसिंह पाटील उंडाळकर यांच्या पॅनलला साथ दिली. त्यामुळे त्यांच्या पॅनेलचा विजय सुखकर झाला होता.

कराड बाजार समिती निवडणुकीत एडवोकेट उंडाळकर व माजी मुख्यमंत्री आमदार चव्हाण यांच्या पॅनेलला बहुमत मिळाले. या निवडणुकीसाठी मोठे कष्ट घेतलेले एडवोकेट उंडाळकर गटाचे युवा कार्यकर्ते विजयकुमार कदम यांना पहिल्यांदा सभापती पद देण्यात आले तर उपसभापतीपदी संभाजी चव्हाण यांना संधी देण्यात आली होती. बाजार समितीच्या सभापती पदाची सर्वांना संधी मिळावी या हेतूने ठराविक कालावधीनंतर सभापती पद दुसऱ्याला देण्याचे ठरले असल्यामुळे सभापती कदम यांनी राजीनामा दिली असल्याची चर्चा आहे.

सभापती विजयकुमार कदम यांनी राजीनामा दिल्यानंतर नवीन सभापती पदाची लॉटरी कोणाला लागणार व ॲडव्होकेट उंडाळकर संधी कोणाला देणार याकडे सध्या सातारा जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

IND vs ENG 2nd Test: 5/84 ते 5/385! हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ यांच्या १५० धावा; १४८ वर्षांच्या इतिहासात जे कधीच घडले नव्हते ते इंग्लंडने केले

Kondhwa Crime : कोंढवा लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी पोलिसांच्या ताब्यात; आरोपी कुरिअर बॉय नसून, आयटी अभियंता

Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला चीनची सक्रिय मदत; लष्कर उपप्रमुखांची माहिती

SCROLL FOR NEXT