Accident sakal media
सातारा

कारच्या धडकेत कचरेवाडीतील विद्यार्थी ठार; तारगाव फाट्यावरील दुर्घटना

अज्ञात कारने धडक दिल्याने ऊस वाहतूकीच्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीखाली सापडल्याने दहावीतील विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची घटना

गजानन गिरी

मसूर : अज्ञात कारने धडक दिल्याने ऊस वाहतूकीच्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीखाली सापडल्याने दहावीतील विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची घटना मसूर- रहिमतपूर रस्त्यावरील तारगाव फाटा चौकात घडली. आकाश सुरेश वाघमारे (वय १५, रा. कचरेवाडी ता. कऱ्हाड) असे अपघातात ठार झालेल्या विद्यार्थ्याचे नाव असून, तो खराडेच्या न्यू इंग्लिश स्कूलचा विद्यार्थी होता. सकाळी शाळा सुरू होण्यापूर्वीच काळाने त्याच्यावर घाला घातल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. अपघाताची नोंद अद्यापही पोलिसात झाली नव्हती.

घटनास्थळावरून मिळालेली माहिती, आकाश वाघमारे हा खराडेतील न्यू इंग्लिश स्कूलचा विद्यार्थी आहे. तो शाळेनजीकच्या तारगाव फाटा चौकातून रस्ता ओलांडताना त्याला अज्ञात कारने धडक दिली. त्यामुळे तो ऊसवाहतुक करणाऱ्या ट्रॅक्टरच्या ट्रॉली खाली पडला. यामध्ये त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, रस्त्यातच त्याचा मृत्यू झाला. शाळेत पोचण्यापूर्वीच त्याचा अपघाती मृत्यू झाल्याने शाळेतील शिक्षकांसह विद्यार्थ्यांना मोठा धक्का बसला आहे.

कचरेवाडी गावांमध्ये शोककळा पसरली आहे. या अपघाताची नोंद आज सायंकाळपर्यंत झाली नव्हती. यासंदर्भात अपघाताची उपलब्ध माहिती असूनही ती देण्यासही पोलिसांनी टाळाटाळ केली. दरम्यान, मसूर- रहिमतपूर, तारगाव, खराडे रस्त्यावर तारगाव फाटा हा चौक मृत्यूचा सापळा बनला आहे. आजपर्यंत या ठिकाणी अनेक अपघात झाले आहेत. चौकानजीकच आरफळ कालवा, उतरता रस्ता अशी स्थिती आहे. चौकात दुभाजक, दिशादर्शक फलक नसल्याने वारंवार अपघात होत आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने चौकात उपायोजना करण्यात याव्यात, अशी मागणी होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Goa Highway Toll Collection : मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम अपूर्ण, टोल वसुली सुरू; नितीन गडकरींच्या आवाहनाला केराची टोपली

लाईव्ह सामन्यात रवी शास्त्रींची मोठी चूक! नाणेफेकीच्या वेळी शुभमन गिलला काय बोलले?

Child Rescue Operation: पंजाबमध्ये कूपनलिकेतून नऊ तासांनंतर मुलगा बाहेर; घराबाहेर खेळताना पडला होता खड्ड्यात, होशियारपूरमध्ये थरारक रेस्क्यू ऑपरेशन!

Rajdhani Express धावत्या राजधानी एक्सप्रेसमध्ये आगीचा भडका, एसी कोच जळून खाक

Amravati : अतिक्रमणातील चहाटपऱ्या काढल्याचा राग, पठ्ठ्या सिलिंडर घेऊन थेट पाण्याच्या टाकीवर चढला अन ....

SCROLL FOR NEXT