Karad Municipality Election  esakal
सातारा

राजकारण बदलणार! भोसले-पाटील गटाला 'नानां'ची साथ?

सचिन शिंदे - सकाळ वृत्तसेवा

भोसले-पाटील गटाच्या एकत्रिकरणाचा दुवा म्हणून नाना गटाचे नाव चर्चेत आहे.

कऱ्हाड (सातारा) : नगरपालिकेच्या (Karad Municipality) राजकीय हालचालींना अद्यापही गती आलेली नसली तरी माजी आमदार आनंदराव पाटील (Anandrao Patil) यांच्या वाढदिवसाला झळकलेल्या अनेक फ्लेक्सने पुन्हा त्या चर्चेला गती मिळाली आहे. या फ्लेक्सवर भाजपचे सरचिटणीस अतुल भोसले (Atul Bhosle) व सहकारमंत्र्याचे बंधू व लोकशाही आघाडीचे अध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांच्या एकत्रित शुभेच्छांचीच शहरात चर्चा आहे. भोसले व पाटील गट एकत्रित येणार असल्याची चर्चा होतीच, आता आनंदराव पाटील ऊर्फ नानांच्या वाढदिवासाच्या प्लेक्सने त्या चर्चेला नवी दिशा मिळाली आहे.

आमदार चव्हाण यांच्या एकेकाळचे निकटचे व सध्या त्या गटापासून फारकत घेतलेले माजी आमदार आनंदराव पाटील यांचा वाढदिवस नुकताच झाला. त्यानिमित्ताने शहरासह ग्रामीण व उपनगरातील शुभेच्छा फलकांची व राजकीय गोळाबेरजेचीही चर्चा आहे. (कै.) प्रेमलाकाकी चव्हाण यांच्यासह शुभेच्छा फलकावर लोकशाही आघाडीचे अध्यक्ष जयंत पाटील, भाजपचे (BJP) अतुल भोसले यांच्या छायाचित्राने साऱ्यांचे लक्ष वेधले. यशवंत जनशक्ती आघाडीच्या माजी नगरसेविका स्मिता हुलवान यांचेही छायाचित्र राजकीय गोळाबेरीज घट्ट आहे, हेच दर्शवते. जिल्हा बँकेच्या निवडणुकीनंतर भोसले व पाटील गटाच्या एकत्रिकरणासह पालकमंत्र्यांची लोकशाही आघाडीही अतुल भोसलेंसोबत पालिका निवडणुकीत उतरणार असल्याची चर्चा आहे. त्याला नानांच्या वाढदिवसाला झळाळी मिळाली आहे.

भोसले व पाटील गटाच्या एकत्रिकरणाचा दुवा म्हणून नाना गटाचे नाव चर्चेत आहे. पालिककेसह शहरातील राजकारणात नाना गटाला सोबत घेवून आमदार चव्हाण गटाला आव्हान दिल्यास ते तगडे असू शकते, असा अंदाज बांधूनच वाढदिवसानिमित्त त्याच ताकदीची झलक दाखवल्याचे दिसते. पालिकेच्‍या मागील निवडणुकीत आमदार चव्हाण यांच्या गटाचे नेतृत्व नानांनी केले होते. त्यावेळी यशवंत विकास आघाडीचे नेते राजेंद्र यादव, माजी उपाध्यक्ष जयवंत पाटील व ‘जनशक्ती’चे नेते अरुण जाधव यांची मोटबांधणी झाली होती. निवडणुकांनंतर गणिते विस्कटली, तर पाच वर्षांत तिन्ही नेत्यांत फारकत आली. त्यामुळे भोसले व पाटील गटाच्या एकत्रिकरणाला नाना गटाची साथ मिळणार असल्याच्या चर्चेने पालिकेच्या निवडणुकीत रंगत वाढणार आहे.

चव्हाण गटाला तालुक्यातही आव्हान

माजी आमदार आनंदराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्ताने तालुक्यातील स्थानिक नेत्यांचेही फ्लेक्स झळकल्याने भोसले गटाला ताकद देण्यासह ग्रामीण नेत्यांच्या एकत्रिकरणातून आमदार पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांच्याभोवती नाना गटाच्या माध्यमातून चक्रव्यूव्ह आखण्याचे संकेत आहेत. त्यातून आमदार चव्हाण गटापुढे तालुक्यातील आव्हान वाढणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ड्रायव्हरच्या बाजूला मान खाली घालून बसलेले मनोज जरांगे; तब्येत अचानक बिघडली, डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू, नेमकं काय झालं?

Devbhumi Jat Name Change Latest News : सांगलीकरांसाठी आनंदाची बातमी! 'देवभूमी जत' नामकरणाचा मार्ग मोकळा, गॅझेट नोटिफिकेशन लवकरच; पालकमंत्री चंद्रकांतदादांची माहिती

Chamoli Tunnel Tragedy: ३० तासांनंतरही ३ मजूर बेपत्ता; बोगद्यातील साचलेले पाणी ठरतेय रेस्क्यू ऑपरेशन्समध्ये मुख्य अडथळा

Marathi News Live Updates : पुण्यातील डेक्कन परिसरातील कॅफेत पहाटे कोयता गँगचा धुमाकूळ

Khambatki Ghat Traffic : पुणे-सातारा महामार्गावर खंबाटकी घाटात वाहनांच्या लांबच लांब रांगा; पारगाव-खंडाळा परिसरात वाहतूक ठप्प, प्रवाशांचे हाल

SCROLL FOR NEXT