satara karad  sakal
सातारा

Karad News : बनावट दारूचे तीन अड्डे उत्पादन शुल्ककडून उदध्वस्त; पाचजणांना अटक, छाप्यात वीस लाखांची दारू जप्त

त्यात तिन्ही छाप्यात तब्बल २० लाखांची बनावट दारू जप्त केली आहे. त्यात पाच जणांना अटक

(शब्दाकंन - सचिन शिंदे)

सातारा

कऱ्हाड - तालुक्यातील तीन वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून उत्पादन शुल्क विभागाने बनावट दारूचे अड्डे उध्वस्त केले. कऱ्हाड व साताऱ्याच्या भरारी पथकाने जुळेवाडी, रेठरे बुद्रुक व मलकापूर येथील अड्ड्यांवर छापे टाकले.

त्यात तिन्ही छाप्यात तब्बल २० लाखांची बनावट दारू जप्त केली आहे. त्यात पाच जणांना अटक केली आहे. फैय्याज मुसा मुल्ला (वय ५३, रा. मलकापूर), शेखर गुणवंत बनसोडे (५०), आयाज आबू मुल्ला (५३) व इर्शाद उर्फ बारक्या शहाबुध्द्दीन मुल्ला (३४, तिघे रा. रेठरे बुद्रूक) व रोहित रमेश सोळवंडे (२६, रा. कुंडल, ता. पलूस ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

उत्पान शुल्क विभागाने दिलेल्या माहितीनुसार उत्पादन शुल्कचे सातारा व कऱ्हाडच्या भरारी पथकाने विभागाने रविवारी (ता. पाच) जुळेवाडी परिसरात रोहित सोळवंडे याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून बनावट दारुची वाहतूक सुरू असल्याची माहिती समोर आली. त्याच्याकडून बनावट देशी दारुचा साठा व चारचाकी वाहनासह वाहनांसह एक लाख ९४ लाखांचा मुद्देमाल त्यांनी हस्तगत केला. संशयीत सोळवंडे यांच्याकडे कसून चौकशी केली. त्यावेळी बनावट दारू अड्ड्यांची माहिती भरारी पथकाला मिळाली.

त्यानुसार भरारी पथकाने आज तिन्ही ठिकाणी कारवाई करत तिन्ही अड्डे उध्वस्त केले. जुळेवाडी येथील देशी दारु दुकानाच्या पाठीमागे छापा टाकण्यात आला. तेथे फैय्याज मुल्ला, शेखर बनसोडे यांना पकडण्यात आले. त्यांच्या ताब्यातून बनावट दारुसाठा तसेच चारचाकी वाहनासह एकूण एक लाख ४० हजार ४८० रूपयांचा मुददेमाल जप्त केला. तिन्ही संशयीतांना सोबत घेवून मलकापूर येथे ग्रीन लँड हॉटेल मागे व रेठरे बुद्रूक येथील कॅनॉल चौकी परिसरातील मुलानकी नावाच्या शिवारात छापे टाकण्यात आले.

तेथे आयाज मुल्ला व इर्शाद उर्फ बारक्या मुल्ला यांना पकडण्यात आले. त्यांच्या ताब्यातून बनावट दारुचा साठा बनावट दारु र्निर्मितीचे साहित्य, कॅप सिलींग मशीन, बनावट लेबले, बनावट बुचे व असे साहित्‍य जप्त करण्यात आले. तिन्ही छाप्यात तब्बल १९ लाख १२ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी, संचालक सुनील चव्हाण, कोल्हापूरचे विभागीय उपायुक्त विजय चिंचाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली व अधीक्षक कीर्ती शेडगे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या कारवाईत निरीक्षक माधव चव्हाण, संजय साळवे, दुय्यम निरीक्षक किशोर नडे,

शरद नरळे, प्रशांत नागरगोजे सहायक दुय्यम निरीक्षक नितीन जाधव, महेश मोहिते, सागर आवळे, मनिष माने, भिमराव माळी, अजित रसाळ, आबासाहेब जानकर, राजेंद्र अवघडे, अरुण जाधव, किरण जंगम, सचिन जाधव, राणी काळोखे जवान यांनी सहभाग घेतला. निरिक्षक माधव चव्हाण तपास आहेत.

तो कट उधळळा...

जुळेवाडीत फैय्याज मुल्लाचे देशी दारुचे दुकान आहे. त्याच्या मालकीच्या देशी दारु दुकानात बनावट दारुचा साठा विकण्याचा टोळीचा कट होता. त्यासाठीच तेथे तो साठा पोचविण्यात आला होता, असेही तपासात पुढे आले आहे. त्या देशी दारु दुकानावरही विभागीय गुन्हा नोंदवण्यात आला आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Child Crime: अल्पवयीन गुन्हेगारांना आता सवलत नाही? वयोमर्यादा १८ वरून १६ वर्षांवर आणणार; महाराष्ट्र सरकारचा मास्टरस्ट्रोक

IND vs ENG 1st T20I: भारत-इंग्लंड मॅच नक्की कुठे पाहायची, Sony की Star Sports? चाहते कन्फ्युज; JioHotstar वाल्याचं काय?

ज्यांच्या नृत्याने महाराष्ट्र डोलला, त्यांच्याच पदरी लग्नानंतर आला इतका त्रास, विठाबाई नारायणगावकर यांची न ऐकलेली कहाणी

July 2026 Calendar: आषाढी एकादशी, जगन्नाथ यात्रा ते गुरु पौर्णिमा; जाणून घ्या जुलै महिन्यातल्या सण-उत्सवांची यादी

Latest Marathi News Live Update : बीडमध्ये शेतीच्या वादातून तलवारीचा हल्ला; काकाची बोटं छाटली, चुलत भावावरही वार

SCROLL FOR NEXT