सातारा

पालकांनाे थांबा! मुलांना वाहन चालविण्यास देऊ नका, कऱ्हाडला पहा काय झाले

सचिन शिंदे

कऱ्हाड :  शहर व परिसरात दुचाकी, चारचाकी वाहन चालवणाऱ्या अल्पवयीन मुलांच्या पालकांवर कारवाई केली जात आहे. शहर पोलिस ठाण्याच्या वाहतूक शाखेने प्रत्यक्षात कारवाई सुरू केली आहे. शनिवारपासून (ता. 26) तब्बल 15 पालकांवर कारवाई झाली आहे. पालकांनी अल्पवयीन मुलांना दुचाकी चालविण्यास देऊ नये, असे आवाहन वाहतूक शाखेने केले आहे.
 
वाहतूक शाखेच्या सहायक पोलिस निरीक्षक सरोजिनी पाटील यांनी पदभार स्वीकारल्यापासून वाहतूक कोडींसह वाहतूक नियमांचे पालनाकडे लक्ष वेधले आहे. त्याचाच एक भाग म्हणून शहर पोलिसांच्या मदतीने शहरातील विविध ठिकाणी वाहन चालविणाऱ्या अल्पवयीन मुलांना पकडून त्यांच्या पालकांवर गुन्हे दाखल केले जात आहेत. विद्यानगर भागातील महाविद्यालय परिसरात वाहन चालविणाऱ्या 15 अल्पवयीन मुलांच्या पालकांवर पोलिसांनी कारवाई केली. विद्यानगर वाहतूक पोलिसांनी ही मोहीम राबवली. त्यात श्रीमती पाटील यांनी विशेष सूचना केल्या. त्यांच्यासह त्या भागात सहायक पोलिस निरीक्षक राहुल वरूटे, श्री. बाबर, फौजदार भरत पाटील यांनीही कारवाईत भाग घेतला.

बॅंक खाते उघडण्याचा प्रश्न मिटला; इच्छुकांना निवडणूक आयोगाचा दिलासा

वर्षा राऊत यांना ED ची नोटीस, जाणून घ्या संपूर्ण घटनाक्रम 

विनापरवाना 15 वाहनचालकांवर कारवाई झाली. त्यात सहा जण 18 वर्षे पूर्ण झालेले नसल्याचे पोलिसांना सापडले. त्यांच्या पालकांवर कारवाई करत गुन्हे दाखल होणार आहेत. शहरातील कोल्हापूर नाका परिसरातही या स्वरूपाची कारवाई झाली. त्या भागात वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी वाहतूक शाखेने विशेष प्रयत्न केले. शहरात येणाऱ्या वाहनांची गती तपासण्यात आली. विनापरवाना वाहन चालविणाऱ्यांवर थेट दंडात्मक कारवाई झाली. त्यातही तीन अल्पवयीन मुलांनाही दुचाकी चालविताना पकडून कारवाई करण्यात आली. त्यांच्या पालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले.

वेश्‍या व्यवसायासाठी आणलेल्या महिलांची पोलिसांनी केली सुटका

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather : पावसाची पुन्हा एन्ट्री! राज्यातील ८ जिल्ह्यांना येलो अलर्ट; तुमच्या भागात कसे असेल हवामान ?

Cutlet Paratha: एकदा बनवाल तर घरच्यांची फर्माईश ठरलेली! असा बनवा स्वादिष्ट कटलेट पराठा

आजचे राशिभविष्य - 29 सप्टेंबर 2026

US-China Trade Deal : अमेरिका-चीन ट्रेड वॉरला ब्रेक! ६० अब्ज डॉलरच्या व्यापारावर मोठा निर्णय, भारताची चिंता वाढली ?

अस्थिबोध : अवघड शस्त्रक्रिया; पण नियोजन अचूक!

SCROLL FOR NEXT