Prithviraj Chavan
Prithviraj Chavan Sakal
सातारा

Prithviraj Chavan : यापुढे प्रत्येक निवडणुकीत महाविकास आघाडी

सकाळ वृत्तसेवा

पुण्यातील कसबा निवडणुकीनिमित्ताने जातीवादी पक्षांना रोखण्याचा महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी होताना दिसत आहे.

कऱ्हाड - पुण्यातील कसबा निवडणुकीनिमित्ताने जातीवादी पक्षांना रोखण्याचा महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी होताना दिसत आहे. त्यामुळे यापुढील येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत महाविकास आघाडीचा प्रयोग दिसणार आहे, अशी माहिती माजी मुख्यमंत्री, आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली.

ते म्हणाले, ‘राज्यात भाजपविरोधी वातावरण आहे. ते देशभर पसरायला वेळ लागणार नाही. राज्यातील शिंदे फडणवीस सरकारचा वैद्यतेबाबतचा निर्णय सुप्रिम कोर्टात आहे. काही दिवसांत त्याचा अंतिम निर्णय येऊ शकतो. केंद्रीय निवडणूक आयोगाने सुप्रिम कोर्टावर दबाव आणण्यासाठी घाईगडबडीत शिवसेनेचे चिन्ह व पक्ष एकनाथ शिंदे गटाला दिले आहे. त्या चिन्हाच्या निर्णयामुळे निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे. निवडणूक आयोगातील नियुक्तीच्या निवडीवरून सुप्रिम कोर्टाने केंद्राला फटकारले आहे.

मागील शिक्षक, पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसह पोटनिवडणुकीत काय झालं ते समोर आहेच, तर नुकत्याच झालेल्या कसबा पोटनिवडणुकीत भाजपची दुर्दशा झाली आहे. तब्बल ३२ वर्षांनंतर कसबा मतदारसंघ भाजपने गमावला. चिंचवडला अपक्षांमुळे महाविकास आघाडीचा पराभव झाला. पोटनिवडणुकीचा दूरगामी परिणाम येणाऱ्या काळात दिसणार आहेत. त्यासह जातीवादी पक्षांना रोखण्याचा महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी होताना दिसतो आहे. त्यामुळे यापुढील निवडणुकीत तो प्रयोग करणार आहोत.’

खासदार संजय राऊत महाविकास आघाडीचे नेते आहेत. त्यामुळे कोणी त्यांची भेट घेतली तर त्यात गैर काही नाही, असे त्यांनी एका प्रश्नावर सांगितले.

महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या बैठका सुरू आहेत. त्या बैठकांमध्ये आगामी निवडणुका संदर्भात चर्चा सुरू आहेत. येणाऱ्या काळात ज्येष्ठ नेते शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्यासह तिन्ही पक्षाचे नेते बैठकांना हजेरी लावतील, असेही त्यांनी सांगितले. या वेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मनोहर शिंदे, इंद्रजित चव्हाण उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT