satara sakal
सातारा

Karad : दोन लाखांची दारूसहीत ताडी जप्त

नारायणवाडी, शहरात छापा दोघांना पोलिसांकडून अटक

- सचिन शिंदे

कऱ्हाड : येथील राज्य उत्पादन शुल्कच्या पथकाने नारायणवाडी ताव शहरात दोन वेगवेगळया ठिकाणी छापा टाकून ताडी व देशी दारूची अवैध वाहतूक रोखली. आज सकाळी ही कारवाई झाली. त्यात दोन चारचाकी वाहनांसह तब्बल ७० लीट देशी दारुचे ८ बॉक्स आणि १४० लिटर ताडी जप्त केली आहे. मुबारक दादापीर मकानदार (३२, रा.शनिवार पेठ) व ) सोमनाथ बबन गायकवाड (२८ रा. खोडशी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

मकदानदारला शहरात तर गायकवाडला नारायणवाडी येथे अटक झाली आहे. दोघांकडून वाहनांसह तब्बल दोन लाखा ८४० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. राज्य उत्पादन शुल्कचे आयुक्तांना हातभट्टी दारु, ताडी व अवैध दारूसहीत चोरटया दारू वाहतुक व विक्रीवर कारवाईचे आदेश दिले आहे. त्यानुसार विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या कारवाईत राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक एस. एस. साळवे, दुय्यम निरीक्षक आर.एस. खंडागळे, विनोद बनसोडे, भिमराव माळी व एस. बी. जाधव यांनी सहभाग घेतला. यापुढेही अशीचकारवाई करण्यात येईल असे विभागाचे निरीक्षक साळवे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT