सातारा

मुलीने आईला हाक मारताच अपहरणकर्त्यांनी मंगळवार पेठेतून काढला पळ

गिरीश चव्हाण

सातारा : करंजे परिसरात राहणाऱ्या आजीच्या घरासमोरील अंगणात खेळणाऱ्या चार वर्षीय बालिकेचे गुरुवारी (ता. 11) अपहरण केल्याच्या कारणावरून करंजे येथील बाबर कॉलनीत राहणाऱ्या अमित शिवाजी बाबर, रवींद्र कुंभार, महेश जाधव यांच्यावर शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. अपहृत चार वर्षांच्या बालिकेला त्यांनी नंतर मंगळवार तळे परिसरात सोडून रिक्षातून पळ काढल्याचा संशय फिर्यादीत व्यक्‍त करण्यात आला आहे.
 
करंजे येथीला बसाप्पा पेठ परिसरात एक महिला भाड्याने खोलीत राहण्यास असून तिची विवाहित मुलगी मंगळवार पेठेत राहण्यास आहे. ती मुलगी एका खासगी हॉस्पिटलमध्ये नोकरीस आहे. नोकरीस जावे लागत असल्याने ती चार वर्षीय मुलीस बसाप्पा पेठेत राहणाऱ्या आईकडे सोडते. सोमवारी (ता. 8) चार वर्षीय बालिका ही बसाप्पा पेठेत राहणाऱ्या आजीकडे राहण्यासाठी आली. गुरुवारी दुपारी चारच्या सुमारास ती अंगणात खेळत होती. यावेळी तिची आजी घरात काम करत होती. काम संपल्यानंतर अंगणात खेळणारी बालिका आजीला दिसली नाही. त्यामुळे त्यांनी शोध घेतला. मात्र, ती सापडली नाही. याबाबतची माहिती आजीने मुलगी, जावयास दिली. याचदरम्यान सायंकाळी एका रिक्षातून त्या बालिकेने मंगळवार पेठेतील एका दवाखान्यात आलेल्या आईला हाक मारली. आईला हाक मारल्याचे पाहून रिक्षात असणाऱ्यांनी तिला सोडत पळ काढला.
 
केस मागे घेण्याच्या कारणावरून गेल्या महिन्यात त्या बालिकेच्या कुटुंबीयांना तिघांनी दम दिला होता. दम देणाऱ्या अमित शिवाजी बाबर, रवींद्र कुंभार, महेश जाधव (रा. बाबर कॉलनी, करंजे) यांनीच त्या बालिकेचे अपहरण केल्याचा संशय शाहूपुरी पोलिस ठाण्यात नोंदविलेल्या फिर्यादीत अपहृत बालिकेच्या आजीने म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

IND vs ENG 1st T20I: सॅमसनचा भारी कॅच घेतला, तर नंबर वन ईशान किशनला घाई नडली अन् झाला शुन्यावर रनआऊट; Video

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

SCROLL FOR NEXT