leopard  sakal
सातारा

Kaspathar: धक्कादायक! कासपठारवर बिबट्याने थेट दुचाकीस्वारावर केला हल्ला

बिबट्याने मानेला, हाताला व पायाला गुडघ्याजवळ पंजे मारून व चावा घेऊन जखमी केले |The leopard injured the neck, arms and legs by clawing and biting near the knees|

सूर्यकांत पवार

Satara News: कास पठार परिसरातील चिकणवाडी (कुसुंबी) गावातील गणेश दगडू चिकणे वय ३७ याच्यावर रविवारी रात्री अकराच्या सुमारास गावाजवळच बिबट्याने दुचाकी चालवत असताना हल्ला करून गंभीर जखमी केले.

या हल्ल्याने डोंगर माथ्यावरील गावात खळबळ उडाली असून थेट वस्तीजवळच हल्ला झाल्याने लोकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.(lepord Attack)

या बाबत सविस्तर वृत्त असे, गणेश चिकणे हा रात्री अकराच्या सुमारास कुसुंबीमुरा गावातून आपल्या चिकणवाडी गावाकडे दुचाकीवरून येत होता. चिकणवाडी गावच्या हद्दीत स्मशानभूमीजवळ मुख्य रस्त्यावर आला असताना अचानक बिबट्याने उडी मारून गाडीवरून खाली पाडले. बिबट्याने मानेला, हाताला व पायाला गुडघ्याजवळ पंजे मारून व चावा घेऊन जखमी केले.

अचानक झालेल्या हल्ल्याने गणेशने आरडाओरडा करताच बिबट्या निघून गेला. त्यानंतर त्याने फोन करून घरी पत्नीला झालेला प्रकार सांगितल्यानंतर गावातील सोपान चिकणे व इतर ग्रामस्थ तात्काळ घटनास्थळी गेले. त्यानी तातडीने कुसुंबीचे सरपंच मारूती चिकणे यांना कल्पना दिली.

त्यानंतर पुढील उपचारासाठी मेढा येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. त्याठिकाणी वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी येऊन प्राथमिक माहिती घेतल्यावर उपचार करण्यात आले. आज वनविभागाच्या वतीने घटनास्थळाचा पंचनामा करण्यात येईल.

कुसुंबीमुरा, चिकणवाडी, सह्याद्रीनगर हा परिसर जंगल व्याप्त असलेने वन्य प्राण्यांचा वावर असतो. पण मानवावर थेट हल्ल्याच्या घटनेने या परिसरातील नागरिकांची चिंता वाढली असून वनविभागाने बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी सरपंच मारूती चिकणे यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

HBA Scheme: तुम्ही होम लोनचा हप्ता भरू शकत नाहीत? सरकारकडून मिळतेय 25 लाख रुपयांची मदत

Disqualification Bill: पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांना 30 दिवस तुरुंगवास झाल्यास पदमुक्त होणार! संसदेत मांडलं जाणार ऐतिहासिक विधेयक

Mobile Protection Tips: पावसाळ्यात मोबाईल भिजतोय? काळजी करू नका, हे उपाय करा!

Prithvi Shaw : मला कुणाची सहानुभूति नकोय... महाराष्ट्र संघाकडून शतक झळकावताच पृथ्वी शॉचा आजी-माजी खेळाडूंना टोमणा

Chiplun Karad Accident : चिपळूण-कऱ्हाड राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात पुण्याचे ५ जण ठार, रिक्षाचा चक्काचूर

SCROLL FOR NEXT