सातारा

सातारा जिल्ह्यातील 'हे' शहर पुढचे पाच दिवस राहणार बंद 

आश्पाक पटेल

खंडाळा (जि. सातारा)  शिरवळ शहरात कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे खबरदारीचा उपाय म्हणून खंडाळा शहरही उद्यापासून (ता.13) पाच दिवस शुक्रवारपर्यंत बंद राहणार आहे. खंडाळा शहराच्या प्रवेशासाठी चेकपोस्ट निर्माण करणार असल्याचे मुख्याधिकारी योगेश डोके यांनी सांगितले.
 
रुग्णसंख्या जिल्ह्यात सर्वाधिक असल्याने शिरवळसह परिसरात घबराट पसरली आहे. शिरवळ हे कोरोनाचे हॉटस्पॉट बनल्याने व लोणंद शहरातही कोरोनाचा शिरकाव झाल्याने यापूर्वी शिरवळ, लोणंद या बाजारपेठा बंद आहेत. खंडाळा बाजारपेठ उघडी असल्याने गर्दी दिवसेंदिवस वाढत आहे. खंडाळा शहरामध्ये लोकांची दुकानासमोरची गर्दी व बाजारपेठ फुल्ल होत होती. त्यामुळे संसर्ग वाढण्याची भीती होती. या पार्श्‍वभूमीवर खंडाळा शहर बंद ठेवण्याची मागणी ग्रामस्थांनी केली होती. यानुसार खंडाळा शहर उद्यापासून बंद ठेवण्यात आले आहे. तालुक्‍यात असणाऱ्या मुख्य शिरवळ, लोणंद व खंडाळा या तिन्ही बाजारपेठा बंद राहणार आहेत. 

खंडाळा येथे बाहेरून येणारे लोकांसाठी चेकपोस्टही उभारण्यात येणार आहे. यामुळे खंडाळा ग्रामस्थांनी यासाठी सहकार्य करावे. स्वतःहून घराबाहेर पडू नये, मास्कचा वापर करावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

संपादन - सिद्धार्थ लाटकर 

सातारा जिल्ह्यातील 'या' गावात नववधू कोरोनाबाधित, 44 जण क्वारंटाइन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शासनाची भन्नाट योजना! ३ लाखांपर्यंत उत्पन्न असलेल्या गरजूंना आता न्यायालयातील केससाठी मिळणार मोफत वकील; जन्मदाखला काढण्यासाठीही विनाशुल्क मदत, वाचा....

आजचे राशिभविष्य - 14 ऑगस्ट 2026

आरोग्य स्वातंत्र्य की रोगाचे पारतंत्र्य

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 14 ऑगस्ट 2026

ढिंग टांग : झुरळांचा झपुर्झा..!

SCROLL FOR NEXT