सातारा

भाविकांनाे! घरबसल्या पहा श्री खंडोबा- म्हाळसाचा विवाह सोहळा

संताेष चव्हाण

उंब्रज (जि. सातारा) : कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर आज (ता. 25)  पाल येथे होणारी श्री खंडोबा देवाची यात्रा भाविकांशिवाय होणार आहे. देवाचे सर्व धार्मिक विधी, रूढी व परंपरा प्रमुख मानकरी व गावातील काही मानकऱ्यांच्या उपस्थितीत होतील. दरम्यान, पाल येथे यात्रेच्या पूर्वसंध्येला सर्वत्र शुकशुकाट होता.
 
यावर्षी मुख्य मिरवणूक रथाऐवजी खुल्या जीपमधून निघेल. मिरवणुकीमध्ये मानकरी तसेच गावातील काटे-देशमुख यांचा मानाचा गाडा, छत्रीधारक मानकरी, गावातील सासनकाठी, पालखी, देवाचा कारखाना अशी निवडक मानकरी मंडळी सहभागी होतील. मात्र, या वर्षी जिल्हा व परजिल्ह्यातील मानकरी, मानाचे गाडे, कोल्हापूर येथील चोपदार यांचा घोडा यांच्यासह भाविकांना परवानगी नाकारण्यात आली आहे. यात्रेला होणारी गर्दी लक्षात घेऊन पोलिस प्रशासनाने सर्वत्र नाकाबंदी केली आहे. यात्रेदरम्यान भाविकांनी व मेवामिठाईच्या दुकानांनी नेहमी गजबजणारे तारळी नदीचे वाळवंट पूर्णतः रिकामे आहे. गेल्या तीन दिवसांपासून श्री खंडोबा मंदिर बंद ठेवण्यात आले असून मंदिर परिसरात शुकशुकाट आहे. भाविकांच्या उपस्थितीने पिवळीधमक होणारी पालनगरी यावर्षी सुनीसुनी दिसून येत आहे. 

शेतक-याने दिला जून्या परंपरेला उजाळा; वाणवसासह लाडक्या लेकीची पाठवणी केली बैलगाडीतून

देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून भाविकांना घरबसल्या श्री खंडोबा व म्हाळसा यांचा मंदिरातील सर्व धार्मिक विधी तसेच विवाह सोहळा लाइव्ह पाहण्यासाठी फेसबुक लाइव्ह तसेच यु ट्यूबची लिंक प्रसारित केली आहे. या लिंकच्या माध्यमातून श्री खंडोबाचे दर्शन व इतर विधी थेट पाहावेत, असे आवाहन देवस्थानचे प्रमुख मानकरी देवराज पाटील व उंब्रज पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक अजय गोरड यांनी केले आहे. भाविकांंनी साेहळा पाहण्यासाठी क्लिक करावे : https://youtu.be/90YxiT4wDpw

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कॅब लवकर हवी? आता आधीच टिप देण्याचा खेळ संपला! सरकारचा Uber-Ola ला मोठा आदेश

Gelatin Blast: पुण्यातल्या कामगाराचं भयंकर कृत्य! कमरेला स्फोटकं बांधून सासरवाडीत पोहोचला, एक बटण दाबलं अन् सगळं संपलं

Onion Rate : मंचर बाजार समितीत कांद्याला दहा किलोस मिळाला ४११ रुपये उच्चांकी बाजार भाव

Sangli Accident: रेणावी घाटात काळाचा घाला! दोन एसटी बस समोरासमोर धडकल्या, तीन जणांचा मृत्यू, काही जखमी

Pune News : प्रशासनातील वाद चव्हाट्यावर! वरिष्ठ अधिकारी दुजाभाव करतात; महापालिका आयुक्तांकडे तक्रार

SCROLL FOR NEXT