Khashaba Jadhav sakal
सातारा

खाशाबा जाधवांमुळे साताऱ्याच्या कुस्ती परंपरेची जगाला ओळख

ऑलिंपिकमध्ये देशपातळीवरील पहिले पदक मिळवल्यामुळे साताऱ्याचे नाव जागतिक पातळीवर

हेमंत पवार-सकाळ वृत्तसेवा

सातारा : सातारा ही शूरवीरांची तसेच मराठ्यांची राजधानी म्हणून ख्यातकीर्त आहे. या भूमीने असंख्य नवरत्न जन्माला घातली. खाशाबा जाधव हेही त्यापैकी एक. त्यांनी ऑलिंपिकमध्ये देशपातळीवरील पहिले पदक मिळवल्यामुळे साताऱ्याचे नाव जागतिक पातळीवर पोचले. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या पाश्वभूमीवर त्यांची ओळख सांगताहेत त्यांचे चिरंजीव रणजित खाशाबा जाधव.

देश स्वतंत्र झाल्यानंतर लगेचच पुढच्या वर्षी म्हणजे १९४८ मध्‍ये महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील कऱ्हाड तालुक्यातील गोळेश्वर या गावचे पैलवान खाशाबा जाधव यांनी १९४८ च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये कुस्ती या खेळ प्रकारात देशाचे प्रतिनिधित्व केले. तेथे त्यांनी ५२ वर्षांच्या ऑलिम्पिक इतिहासात सहावे स्थान पटकावणारे पहिले भारतीय आणि पहिले महाराष्ट्रीयन खेळाडू ठरले. पैलवान खाशाबांनी आपल्या ध्येयाची पूर्तता करण्याची मनाशी खूणगाठ बांधून पुढील १९५२ च्या हेलसिंकी येथील १५ व्या ऑलिम्पिक स्पर्धेत पुन्हा भारताचे प्रतिनिधित्व करत या देशासाठी पहिले वैयक्‍तिक कास्यपदक कुस्ती या क्रीडा प्रकारात पटकावले. त्यानंतर त्यांची कामगिरी भारतीय क्रीडा क्षेत्रामध्ये सोनेरी अक्षरात कोरली गेली. ती मैलाचा दगड ठरली.

महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेची सर्वप्रथम १९५३ मध्‍ये स्थापना झाली. मामासाहेब मोहोळ, हिरे व आवटी यांच्या प्रयत्नांनी १९५६ रोजी शामराव मुळीक (सातारा) आणि विष्णू नागराळे यांच्यात लढत ठरली होती. तथापि, विष्णू नागराळे यांचे निधन झाले. त्यामुळे ती स्पर्धा रद्द झाली. १९५९ मध्‍ये हिंद केसरी स्पर्धा सुरू झाल्या. त्यावर्षी महाराष्ट्र केसरी स्पर्धा झाल्या नाहीत. श्रीपती खंचनाळे हिंदकेसरी झाले. १९६० मध्‍ये कोल्हापूरचे उंचकट्टी व सांगलीचे लक्ष्मण कागती यांची कुस्तीची लढत झाली. मात्र, गुण समसमान झाल्याने लढत अनिर्णित राहिली. या स्पर्धेचे वैशिष्ट्य असे की, ६८ वर्षांत अनेक पदवीधर डॉक्टर, इंजिनिअर महाराष्ट्रातून झाले. परंतु, महाराष्ट्र केसरी स्पर्धेत फक्त एक विजेता पैलवान हा त्या वर्षाचा संपूर्ण महाराष्ट्राचा केसरी होतो.

यावरून या स्पर्धेची भव्यता, रुबाब, जनमाणसात ती किती प्रचलितपणे मानली आहे, हे लक्षात येईल. या ६१ वर्षांत सातारा जिल्ह्यातून बापू लोखंडे (१९८१), धनाजी फडतरे (१९९९), गोरख सरक (काटोल) ( १९९८), (कै.)संजय पाटील (१९९४) इत्यादी महाराष्ट्र केसरी झाले. अनेक चांगले मल्ल अंतिम फेरीपर्यंत पोचले. परंतु, दुर्दैवाने अंतिम लढतीमध्ये त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. त्यामध्ये चंद्रकांत सूळ, आबा सूळ, बाळू पडघम यांचा उल्लेख करावा लागेल.

खाशाबांच्या या राज्यात असंख्य पैलवान मेहनत घेत आहेत. जिल्ह्यात अनेक खयातकीर्त पैलवान झाले. उदयोन्मुख खेळाडू सराव करीत आहेत. परंतु, अद्यापर्यंत कोणीही ऑलिम्पिक पदकापर्यंत गवसणी घातली नाही. मागील काही दशकांमध्ये श्रीपती खंचनाळे, हरिश्चंद्र बिराजदार, गणपत आंदळकर, बंडा रेठरेकर, मारुती माने, मारुती आडकर, के. डी. मानगावे, श्रीरंग जाधव यांनी ऑलिम्पिकपर्यंत धडक मारली. सातारच्या पैलवानांनी येणाऱ्या काही वर्षात खाशाबांची परंपरा पुढे चालविण्यासाठी जिवापाड मेहनत घेऊन निव्वळ साताऱ्यापुरते सीमित न राहता सातासमुद्रापार झेंडा फडकावण्याचा यशस्वी प्रयत्न करावा. त्यातून खाशाबांची परंपरा पुढे चालवावी, हेही या स्पर्धेनिमित्त करून शिवधनुष्य पेलावे, अशी अपेक्षा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray Full Speech : मराठी, मुंबई, महाराष्ट्र अन् बाळासाहेब ठाकरेंचा किस्सा : राज ठाकरेंचं 25 मिनिटांचं प्रचंड आक्रमक भाषण

Raj Thackeray : ''ठाकरेंची मुलं इंग्रजी मिडियम शिकतात'' म्हणणाऱ्या फडणवीसांना राज ठाकरेंनी सुनावलं; म्हणाले, ''मी हिब्रूत शिकेन पण...''

Latest Maharashtra News Updates : लाडक्या बहिणीचं पोर्टल बंद, आता नव्याने नोंदणी होणार नाही - ठाकरे

Raj Thackeray: ''कानाखाली द्या पण व्हिडीओ काढू नका'' केडिया प्रकरणावर राज ठाकरेंनी मनसैनिकांना कोणता संदेश दिला?

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी! उद्धव ठाकरेंची युतीची घोषणा, म्हणाले, "दोघे भाऊ सत्ताधाऱ्यांना फेकून देणार"

SCROLL FOR NEXT