Bribery Case
Bribery Case esakal
सातारा

'लाच' घेताना खटाव पंचायतीचा कर्मचारी रंगेहात जाळ्यात

आयाज मुल्ला

वडूज (सातारा) : उसाचे यंत्र (Sugarcane Machine) खरेदी करण्यास मिळालेल्या पैशाच्या मोबदल्यात पडताळणीसाठी आठ हजार रुपयांची लाच घेताना खटाव पंचायत समितीचा (Khatav Panchayat Committee) एक कर्मचारी लाचलुचपत विभागाच्या (Anti Corruption Department) जाळ्यात सापडला आहे. रविकांत नारायण लोहारा (वय ४६, कनिष्ठ सहायक वर्ग तीन) असे या कर्मचाऱ्याचे नाव आहे. (Khatav Panchayat Employee Arrested In Bribery Case Satara Crime News)

दरूज येथील मागासवर्गीय तक्रारदारास जिल्हा परिषदेच्या २० टक्के अनुदानातून उसाचे रसयंत्र ही वस्तू खरेदी करण्याचा प्रस्ताव होता.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, दरूज येथील मागासवर्गीय तक्रारदारास जिल्हा परिषदेच्या २० टक्के अनुदानातून उसाचे रसयंत्र ही वस्तू खरेदी करण्याचा प्रस्ताव होता. या प्रस्तावाची पडताळणी करण्यासाठी श्री. लोहारा याने तक्रारदाराकडे ८ हजार ५०० रुपयांची लाच मागितली होती. त्यामध्ये तडजोडी अंती ८ हजार रुपये घेताना गुरुवारी (ता. १७) सायंकाळी पाच वाजण्याच्या दरम्यान लाचलुचपत विभागाच्या पोलिस निरीक्षक आरिफा मुल्ला (Police Inspector Arifa Mulla) व पोलिस हवालदार श्री. शिंदे, काटकर, भोसले यांच्या पथकाने लोहारा यास रंगेहात पकडले. अधिकाऱ्यांना लाचलुचपतचे पुणे विभागीय पोलिस अधीक्षक राजेश बनसोडे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक सुहास नाडगौडा, सूरज गुरव आदींचे मार्गदर्शन लाभले. या कारवाईने पंचायत समितीच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांत खळबळ माजली आहे.

Khatav Panchayat Employee Arrested In Bribery Case Satara Crime News

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT