सातारा

उदयनराजेंचा भाचा असल्याचे सांगून 'त्याने' केला काेल्हापूरात दूसरा विवाह; 29 लाखांना फसविले

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : पहिल्या लग्नाची माहिती लपवून तरुणीशी दुसरे लग्न करून ती व तिच्या नातेवाईकांची २९ लाखांची फसवणूक करणाऱ्या संशयितावर करवीर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. विश्‍वनाथ शहाजी घाटगे (वय ३०, रा. वाघापूर, ता. भुदरगड) असे त्याचे नाव आहे.

संशयित विश्‍वनाथ घाटगे याने संकेतस्थळावरून एका तरुणीशी ओळख निर्माण केली. स्वतःचा गुळाचा व्यवसाय असल्याचे सांगून त्या तरुणीशी प्रेमसंबंध निर्माण केले. त्यानंतर त्याने स्वतःच्या पहिल्या लग्नाची माहिती लपवून त्या तरुणीशी लग्न केले. त्याने विश्‍वास संपादन करून गूळ व्यवसायासह अन्य कारणांसाठी संबंधित तरुणी व तिच्या नातेवाईकांकडून २९ लाख २५ हजार रुपये घेऊन फसवणूक केली.

शिक्षकाने राबविलेल्या स्टोरी ऑन फोन उपक्रमास जागतिक पुरस्कार 

शिष्यवृत्तीच्या बहाण्याने विद्यार्थ्यांच्या पालकांना गंडा!

हा प्रकार मार्च ते २७ डिसेंबर २०२० अखेर आर.के.नगर येथे घडला. त्याने आपण खासदार उदयनराजे भोसले यांचा भाचा असल्याचेही खोटे सांगितले होते, असे निर्मला मधाळे यांनी फिर्यादीत म्हटल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. त्यावरून विश्वनाथ घाटगे याच्यावर रविवारी (ता.27) फसवणुकीचा गुन्हा नोंद झाला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

प्रवाशांनो, कृपया लक्षात द्या... तुम्ही प्रवास करत असलेल्या रेल्वेचे भाडे आजपासून महागले, किती वाढ झाली हे पाहण्यासाठी क्लिक करा

Ramdas Athawale : लाखोंची भीमशक्ती भाजपच्या पाठीशी; ‘रिपाइं’च्या संकल्प मेळाव्यास भीमसैनिकांची मोठी उपस्थिती

Gold Rate Today : सोन्याची घौडदौड सुरूच! भावात सलग पाचव्या दिवशी वाढ, चांदीही महागली; तुमच्या शहरात काय आहे आजचा ताजा भाव? जाणून घ्या

Latest Marathi News Live Update : कोल्हापूर महापालिका निवडणुकीसाठी पहिल्या ३० उमदेवारांची यादी काँग्रेसकडून आज प्रसिद्ध होण्याची शक्यता

Gujarat Earthquake Today : पहाटे गुजरात हादरलं; कच्छ भागात भूकंपाचे धक्के, भूकंपशास्त्र विभागाची माहिती

SCROLL FOR NEXT