Udayanraje vs Shivendraraje Bhosale Satara Gopalkala esakal
सातारा

Satara Dahihandi : निवडणुकीच्या तोंडावर साताऱ्यात दहा लाखांच्या दहीहंड्या; दोन्ही राजेंच्या समर्थकांचे जोरदार शक्तिप्रदर्शन

उदयनराजेंच्या समर्थकांची दोन लाख ५१ हजार रुपयांचे बक्षीस असलेली दहीहंडी सर्वांचे लक्ष वेधणार

सकाळ डिजिटल टीम

दहीहंडीसाठी लावलेल्या बक्षिसांवरून खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या समर्थकांत चढाओढ पाहायला मिळत आहे.

सातारा : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर येणाऱ्या प्रत्येक सणात साताऱ्यातील दोन्ही राजांचे समर्थक संधी सोडत नाहीत. आता श्री कृष्णाजन्माष्टमी (Krishna Janmashtami) गोपाळकाल्यानिमित्त दहीहंडीच्या (Dahi Handi) माध्यमातून दोन्ही राजांच्या समर्थकांचे जोरदार शक्तिप्रदर्शन होणार आहे.

त्यासाठी शहरात ५० हजारांपासून ते अडीच लाखांपर्यंतची बक्षिसे असलेल्या तब्बल दहा दहीहंड्यांचे आयोजन केले आहे. याची एकत्रित बक्षिसाची रक्कम दहा लाखांवर आहे. आगामी दोन तीन दिवस शहरात राजकीय दहीहंड्यांचा थरार पाहायला मिळणार आहे.

नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर साताऱ्यात दोन्ही राजांत (Udayanraje Bhosale Shivendraraje Bhosale) कोणत्याही कार्यक्रम, सण, उत्सवातून शक्तिप्रदर्शन व आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. आता कृष्ण जन्माष्टमीनिमित्त आज (गुरुवारी) गोपाळकाल्याचा कार्यक्रम होत आहे. त्यासाठी शहरात लहान मोठ्या अशा तब्बल दहा दहीहंड्यांचे आयोजन करण्यात आले आहे.

यासाठी लावलेल्या बक्षिसांवरून खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या समर्थकांत चढाओढ पाहायला मिळत आहे. ५१ हजार रुपयांपासून ते दोन लाख ५१ हजार रुपयांपर्यंतची बक्षीस असलेल्या दहीहंड्यांचे आयोजन केले आहे. खासदार उदयनराजे यांच्या समर्थकांची दोन लाख ५१ हजार रुपयांचे बक्षीस असलेली दहीहंडी सर्वांचे लक्ष वेधणार आहे, तर आमदार शिवेंद्रसिंहराजेंच्या समर्थकांची एक लाख ५१ हजारांची दहीहंडी आहे.

थरार अनुभवणार...

या हंड्या गांधी मैदानावर दोन, तालीम संघाच्या मैदानावर दोन, मल्हारपेठ चौकांत एक, गीते बिल्डिंग चौकात एक अशा सहा मोठ्या दहीहंड्या होणार आहेत. शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील लहान, मोठ्या अशा आठ दहीहंड्यांचे आयोजन केले आहे. सातारा शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत लहान मोठ्या अशा दहा दहीहंड्या होतील. मोठ्या पाच दहीहंडींची रक्कम दहा लाखांच्या पुढे जात आहे. आता आगामी दोन- तीन दिवस सातारा शहरात खासदार, आमदार समर्थकांच्या दहीहंड्यांचा थरार सातारकरांना अनुभवयास मिळणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akola News: शहरातील ३५ पाण्याच्या टाक्यांची होणार दुरुस्ती; चार झोनमध्ये पाणीपुरवठा व्यवस्थापनाचे नियोजन

Nanded Crime: माहूर तालुक्यातील बंद खडी केंद्रावरील गिट्टी साठा बेकायदेशीर; एक कोटी ९९ लाखाचा दंड, तहसीलदारांची कारवाई!

Latest Marathi News Live Update : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील रांजणगावमध्ये तरुणावर लाकडी बॅटने हल्ला, व्हिडिओ व्हायरल

'म्हातारपणात स्वतःची माती कशाला...' प्रसिद्ध अभिनेत्री मीनाक्षी शेषाद्रीला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, म्हणाले...'हे करण्यापेक्षा चारधाम यात्रा...'

Viral status Thackeray group : ‘उद्धवरावांची उद्‌ध्वस्त सेना’ ठाकरेंच्या प्रमुख नेत्याच्या स्टेटसने चर्चा, ५ मिनीटात डिलीटही केलं

SCROLL FOR NEXT