Bacchu Kadu
Bacchu Kadu sakal
सातारा

...तर कृष्णा नदीपात्रात जलसमाधी घेणार; 'बळीराजा'चा इशारा

हेमंत पवार

कऱ्हाड - सातारा जिल्ह्यातील मराठवाडी मध्यम प्रकल्पामुळे बाधित प्रकल्पग्रस्त सांगली जिल्ह्यातील वांग-रेठरे, शाळगाव येथे वास्तव्यास आहेत. त्यांना सांगली जिल्हा परिषदेने मुलभूत सुविधा द्याव्या. अन्यथा प्रकल्पग्रस्तांना सोबत सांगली येथील कृष्णा नदीत जलसमाधी घेवु असा इशारा बळीराजा शेतकरी संघटनेचे सातारा जिल्हाध्यक्ष साजिद मुल्ला यांनी दिला आहे. त्याची माहिती मंत्री बच्चू कडु यांना दिल्याचेही त्यांनी सांगीतले.

श्री. मुल्ला म्हणाले, सातारा जिल्ह्यातील मराठवाडी मध्यम प्रकल्पामुळे वांग रेठरे या गावचे पुनर्वसन कडेगांव तालुक्यातील शाळगाव येथे झाले. हे गाव पुनर्वसित वांग रेठरे गावापासून तीन किलो मीटर लांब असल्यामुळे रेठरे गावास कोणत्याही मुलभूत सुविधा मिळत नाहीत. कृष्णा खोरेचे उपकार्यकारी अभियंता यांनी प्रकल्पग्रस्तांची मिटिंग घेऊन सर्व मुलभूत सुविधा देतो, हस्तांतरण कागदावर सह्या द्या, असे सांगितले. प्रकल्पग्रस्तांनी विश्र्वास ठेवुन सह्या दिल्या.

अपुर्ण सुविधा, पिण्याच्या पाण्याची पाइपलाइन नवीन टाकून दे,णे तुटलेली गटारे दुरूस्त करून देणे गावातील रस्त्यावरील दिवा बत्तीचे बिल भरणे अशा मुलभूत सुविधा देतो असे त्या अधिकाऱ्याने सांगितले. हस्तांतरण कागदावर सह्या झाल्यानंतर अधिकाऱ्याने दुर्लक्ष केले.

रेठरे गावातील सुमारे दहा लाख रुपये लाईट बील आले आहे. सांगली जिल्हा परिषद त्याकडे दुर्लक्ष करत आहेत. कडेगांवचे बीडीओंनी प्रकल्पग्रस्तांना लोकवर्गणी काढून बिल भरण्याचा सल्ला दिला आहे. त्यासंदर्भात मंत्री कडु यांना माहिती दिल्यावर त्यांनी तात्काळ मुलभूत सुविधा देण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्या सुविधा तात्काळ मिळाल्या नाहीत तर बळीराजा शेतकरी संघटना वांग रेठरे प्रकल्पग्रस्तांना बरोबर घेऊन सांगली येथे कृष्णा नदीत जलसमाधी घेणार आहे. याची प्रशासनाने दखल घ्यावी असाही इशारा श्री. मुल्ला, सांगली जिल्हाध्यक्ष डॉ. उन्मेश देशमुख, चंद्रकांत यादव,आकाश रेठरेकर यांनी इशारा दिला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Telangana CM Revanth Reddy : तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना दिल्ली पोलिसांचं समन्स; अमित शाहांच्या व्हिडीओचं प्रकरण

Sairat Complete 8 Years : मराठी सिनेमाला १०० कोटींचं स्वप्न दाखवणाऱ्या 'सैराट'ला ८ वर्षं पूर्ण; रिंकूची पोस्ट चर्चेत

Share Market Closing: शेअर बाजारात तुफान तेजी; सेन्सेक्स 900 अंकांच्या उसळीसह बंद, गुंतवणूकदार मालामाल

Latest Marathi News Live Update: सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरणी तीन आरोपींना पोलीस कोठडी तर एकाला न्यायालयीन कोठडी

Nashik News : मालेगावी भाजीपाल्याची आवक स्थिर! मे, जून महिन्यात उत्पादन घटण्याचा अंदाज

SCROLL FOR NEXT