Ladki Bahin Yojana esakal
सातारा

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींचे सात हजार अर्ज निराधार; अपात्र अर्जदारांनी काय करायचे? प्रशासनाने सांगितला उपाय

Ladki Bahin Yojana Application Rejected: या योजनेंतर्गत पात्र लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात दरमहा दीड हजार रुपये रक्कम जमा केली जाणार आहे. त्यासाठी संबंधित महिलेचे बँक खाते आधार संलग्न (आधार सीडिंग) असणे आवश्यक आहे.

सकाळ वृत्तसेवा

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी सातारा जिल्ह्यातून पाच लाख २१ हजार ७० अर्ज ऑनलाइन प्राप्त झाले आहेत.

या अर्जाचे छाननी प्रक्रिया पूर्ण झाली असून, त्यामधील सात हजार ९४ अर्ज अपात्र करण्यात आले आहेत.

या योजनेंतर्गत पात्र लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात दरमहा दीड हजार रुपये रक्कम जमा केली जाणार आहे. त्यासाठी संबंधित महिलेचे बँक खाते आधार संलग्न (आधार सीडिंग) असणे आवश्यक आहे.

ज्या महिलांचे बँक खाते आधार संलग्न नाही. अशा महिलांनी संबंधित बँकेत जाऊन बँक खाते आधार संलग्न करण्याची कार्यवाही करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करताना अर्जामध्ये नमूद आधार क्रमांकाला संलग्न केलेल्या बँक खात्यात लाभाची रक्कम थेट (डीबीटीद्वारे) जमा केली जाणार आहे. त्यामुळे महिलांनी आधार संलग्न करून घ्यावे, तसेच या योजनेतील लाभार्थ्यांनी ई-केवायसी करणेही आवश्यक आहे.

दरम्यान, या योजनेत प्राप्त ऑनलाइन अजर्जापैकी जवळपास सात हजार ९४ अर्जामध्ये त्रुटी आढळल्याने ते अर्ज परत पाठविण्यात आले आहेत. दरम्यान, लाभार्थ्यांच्या बँक खात्याशी आधार संलग्न बंधनकारक असून, बहुतांश अर्ज आधार संलग्न नसल्याने तूर्त अपात्र ठरल्याचे दिसून आले आहे

पुन्हा ऑनलाइन अर्ज करावा

अपात्र अर्जामध्ये दुरुस्ती करून ऑनलाइन स्वरूपात पुन्हा सादर करण्याची कार्यवाही सुरू आहे. त्रुटीमुळे परत पाठविलेल्या अर्जाची माहिती संबंधित अर्जदाराच्या लॉगिनला आणि अर्ज ज्या ठिकाणी भरला होता, त्या यंत्रणेकडे उपलब्ध आहे.

या अर्जामध्ये त्रुटीची पूर्तता करून आवश्यक कागदपत्रांसह हे अर्ज पुन्हा ऑनलाइन स्वरूपात सादर करावेत, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: पुण्यात एकनाथ शिंदेंकडून 'जय गुजरात'ची घोषणा; अमित शाहांच्या उपस्थितीत नारेबाजी, व्हिडिओ व्हायरल

IND vs ENG 2nd Test: W,W,W,W,W! मोहम्मद सिराज ऑन फायर, बेन स्टोक्स गांगरला; इंग्लंडचा निम्मा संघ तंबूत परतला

ती खूपच बारीक, काळी-सावळी... प्रियांका चोप्राला पहिल्यांदा पाहिल्यावर थक्क झालेली मराठी अभिनेत्री; म्हणाली- ती हिरोईन बनायला आलेली...

FASTag Annual Pass: FASTag वार्षिक पास घ्यायचा विचार करताय? मग घेण्यापूर्वी 'हे' 11 महत्त्वाचे प्रश्न आणि त्यांची सविस्तर उत्तरं जरूर वाचा!

Magnesium & Vitamin D Deficiency: व्हिटॅमिन-D ची पातळी कमी होण्यामागे असू शकतो 'या' खनिजांचा अभाव, 'हे' अन्नपदार्थ ठरतील उपयुक्त

SCROLL FOR NEXT