Khambatki Ghat on Satara-Pune Highway esakal
सातारा

Khambatki Ghat : सातारा-पुणे महामार्गावरील खंबाटकी घाटात बोगदा ओलांडल्यावर धोका वाढतोय; काय आहे कारण?

साताऱ्याहून पुण्याकडे जात असताना खंबाटकी घाट ओलांडल्यानंतर लगेच पहिल्या वळणावर एक मोठी टेकडी आहे.

अशपाक पटेल

खंबाटकी घाटात (Khambatki Ghat) बोगदा ओलांडल्यावर पहिल्याच वळणावर डोंगर- टेकडीवरील काही छोटी दगड-गोटे वारंवार महामार्गावर येत आहेत.

खंडाळा : सातारा-पुणे महामार्गावरील (Satara-Pune Highway) खंबाटकी घाटात (Khambatki Ghat) बोगदा ओलांडल्यावर पहिल्याच वळणावर डोंगर- टेकडीवरील काही छोटी दगड-गोटे वारंवार महामार्गावर येत असल्याने वाहनांच्या अपघात होऊ शकतो. प्रसंगी दरड कोसळण्याची भीती व्यक्त होत आहे.

मात्र, संबंधित विभागाने याकडे दुर्लक्ष होत असल्याने वाहनचालकांकडून संताप व्यक्त होत आहे. याबाबत माहिती अशी, की साताऱ्याहून पुण्याकडे जात असताना खंबाटकी घाट ओलांडल्यानंतर लगेच पहिल्या वळणावर एक मोठी टेकडी आहे. यावरील लहान-मोठे दगड हे सतत महामार्गावर येत असतात.

हे दगड पाऊस पडल्यानंतर किंवा जोरदार वादळ वारा सुटल्यानंतर नजरेस पडतात. मात्र, एखाद्या वेळेस न दिसल्यास अपघात होण्याची भीती व्यक्त होत आहे. महामार्ग प्राधिकरणाने या डोंगरकड्यावर लोखंडी जाळी लावणे गरजेचे आहे, तसेच यावर तत्काळ उपाययोजना करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT