Netaji Subhashchandra High School esakal
सातारा

कोयनेवर अस्मानी संकट! नेताजी सुभाषचंद्र हायस्कूलमागे 30 फूट भगदाड

मिरगाव, गोकुळनाला, हुंबरळी गावांवर संकट

विजय लाड

कोयनानगर (सातारा) : मुसळधार पावसाने (Heavy Rain) रौद्ररूप धारण केल्यामुळे कोयना विभागावर आपत्तीचा डोंगर (Koynanagar Landslide) कोसळला. मिरगाव, बाजे, गोकुळनाला, हुंबरळी या गावांवर अस्मानी संकट कोसळले आहे. तिन्ही गावांतील लोकांना कोयनानगर येथील नेताजी सुभाषचंद्र हायस्कूल (Netaji Subhashchandra High School) येथे सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित केले आहे. मात्र, या हायस्कूललाच भूस्खलनाचा फटका बसला आहे. हायस्कूलच्या कार्यालयाच्या मागे २५ ते ३० फूट मोठे भगदाड पडले आहे. बाधित गावांतील जनतेच्या मागे लागलेल्या संकटांच्या समस्या पाठ सोडत नसल्याचे या घटनेवरून अधोरेखित झाले आहे.

मुसळधार पावसाने रौद्ररूप धारण केल्यामुळे कोयना विभागावर आपत्तीचा डोंगर कोसळला आहे.

कोयना विभागात २२ जुलैला झालेल्या धुवाधार पावसाने विभागात अनेक ठिकाणी भूस्‍खलन झाल्याने अनेक गावांना धोका निर्माण झाला आहे. मिरगाववर तर आपत्तीचा डोंगर आला आहे. या गावातील ११ तर ढोकावळे येथे चार लोक ढिगाऱ्याखाली गाडली गेली आहेत. विभागातील हुंबरळी येथे मुसळधार पावसात एक घर पडून एका महिलेचा मृत्यू झाला. बाजे, गोकुळनाला या गावावर दरडी कोसळत असल्याने ही गावे भीतीच्या छायेत आहेत. मिरगाव या गावातील सर्व ग्रामस्थांचे कोयनानगर येथील मराठी शाळेत स्थलांतर केले आहे.

ढोकावळे येथील कुटुंबांना चाफेर-मिरगाव येथील हायस्कूलमध्ये, हुंबरळी येथील बाधित कुटुंबे एमटीडीसीमध्ये, तर बाजे व गोकुळनाला येथील बाधित कुटुंबे नेताजी सुभाषचंद्र हायस्कूल येथे स्थलांतरित केली आहेत. या हायस्कूलच्या कार्यालयामागे २५ ते ३० फूट खोल मोठे भूस्‍खलन होऊन या इमारतीला धोका निर्माण झाला आहे. यामुळे शाळा प्रशासन पुन्हा एकदा चिंतेत पडले आहे. बाधित कुटुंबांची पाळीव, मुकी जनावरे गावातच आहेत. मुक्या जनावरांच्या ओढीने स्थलांतरित केलेले लोक आमचे तातडीने पुनर्वसन करा, अशी मागणी करत असून आपल्या घरी जाऊन या मुक्या जनावरांना चारा घालून पुन्हा छावणीत येत आहेत.

कोयनेतील नेताजी सुभाषचंद्र विद्यालयाच्या कार्यालयामागे मोठे भगदाड पडले आहे. त्यामुळे शाळेच्या इमारतीला धोका निर्माण झाला आहे. प्रशासनाने याची नोंद घेऊन योग्य ती कार्यवाही करावी.

-एम. जे. गिरीगोसावी, मुख्याध्यापक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET Paper Leak Case : नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयचा मोठा खुलासा; कोर्टात उघड झाले धक्कादायक तपशील, मनिषा मांढरेचा घटनाक्रम सांगितला

Night Heat Reason : सूर्य मावळला तरी घरात उकडतंय? रात्रीसुद्धा एवढं गरम का वाटतं? वैज्ञानिकांनी सांगितलं आश्चर्यकारक कारण

Shaktipeeth Highway Protest : शक्तीपीठ महामार्गाविरोधात सोलापुरातील शेतकरी संतप्त, पुणे-सोलापूर महामार्ग ठप्प; राजू शेट्टी पोलिसांत शाब्दिक चकमक

“लोकसंख्या कमी करायची जबाबदारी आहे माझ्यावर…” शंशाक केतकर व्हिडिओ शेअर करत म्हणाला... 'हिंदू आहे आणि...'

Latest Marathi News Live Update : दहावी-बारावीच्या उत्तरपत्रिकेतील छेडछाड आता गुन्हा ठरणार

SCROLL FOR NEXT