सातारा

''हेल्मेटमुळे बचावलाे, अन्यथा बिबट्याने खात्माच केला असता''

विलास माने

मल्हारपेठ (जि. सातारा) : विहे स्मशानभूमीनजीक येथील वीज वितरण कंपनीच्या रखवालदारावर बिबट्याने हल्ला केला. डोक्‍यावर असलेल्या हेल्मेटमुळे ते हल्ल्यातून थोडक्‍यात बचावले. शनिवारी रात्री साडेनऊ वाजता हा प्रकार घडला. विहे ते नहिंबे शिरंबे गावामध्ये कऱ्हाड-पाटण महामार्गावर विहेवरून मल्हारपेठला कामासाठी आबासाहेब चव्हाण (वय 50) हे दुचाकीवरून जात होते. विहेतील स्मशानभूमीनजीक आल्यावर बिबट्याने अचानक त्यांच्यावर हल्ला केला. 

बिबट्याने त्यांच्या अंगावर झेप घेतली. मात्र, डोक्‍यावरील हेल्मेटवर बिबट्याच्या पायाचा पंजा पडला. त्यावरच नखे ओरखडली गेली. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे चव्हाण यांनी आरडाओरड केली. मात्र, आजूबाजूला कोणी नसल्याने नहिंबे चिरंबे येथे जाऊन स्टॉपवरील ढाब्यावर घडलेला प्रकार नागरिकांना सांगितला. हेल्मटेमुळे बचावलाे असेही त्यांनी सांगितले.

त्यानंतर वन विभागाच्या अधिकाऱ्यांना दूरध्वनी करून घडलेल्या घटनेबाबत माहिती देण्यात आली. वन विभागाने घटनेच्या ठिकाणी पेट्रोलिंग वाहनाने रात्रगस्त देत पहारा दिला. विहे घाट ते स्मशानभूमीपर्यंत बिबट्याचा वावर असून वन विभागाने बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

नोकियातील अखेरच्या दीड हजार कर्मचाऱ्यांनी काय केलं?

जमिनीचा वाद मिटविण्यासाठी आईला दिले पेटवून; फिर्यादी सूनच बनली संशयित आराेपी 

अन्याय करणा-यांना धडा शिकवा : राजमाता कल्पनाराजे भाेसले

भारतीयांच्या गळ्यातील ताईत हिमा दास आता बनणार डीएसपी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MSRTC Employees DA Hike : एसटी महामंडळाच्या ८६ हजार कर्मचाऱ्यांना दिलासा, महागाई भत्ता ५८ टक्क्यांपर्यंत वाढवला; मंत्री सरनाईकांची माहिती

IPL 2027 Trade: आयपीएल इतिहासातील High-Profile डिल! रिषभ पंत १२ कोटींचा तोटा सहन करून 'या' संघाच्या ताफ्यात, कुलदीप यादव LSG कडे

Aditya Thackeray: "स्वतःच्या खात्याची माहिती नाही, उत्तर द्यायलाही भीती!" आदित्य ठाकरेंचा शिंदेंवर घणाघात, सभागृहावर बहिष्कार

Latest Marathi News Live Update : पहिल्याच पावसात एसटीची पोलखोल! नवापूर-नाशिक बसमध्ये छतातून पाण्याचा वर्षाव

लाँच होतीये Motorola Edge 70 Max सिरिज; तब्बल 5 स्मार्टफोनचं पॅकेज, प्रीमियम फीचर्स अन् परवडणारी किंमत फक्त...

SCROLL FOR NEXT