Satara Sakal
सातारा

औंध शिक्षण मंडळाची दैदिप्यमान परंपरा जतन करू : अजित पवार

औंधमध्ये साने गुरुजी,ग.दि.माडगूळकर,शंतनू किर्लोस्कर आदींनी या ठिकाणी शिक्षण घेतले आहे

शशिकांत धुमाळ

औंध : औंधच्या (Aundh) मातीत अनेक नामवंतांनी शिक्षण घेतले आहे,औंध शिक्षण मंडळाला मोठा वारसा असून औंध शिक्षण (Education) मंडळाची दैदिप्यमान परंपरा जतन करू असे मत उपमुख्यमंत्री व औंध शिक्षण मंडळाचे अध्यक्ष ना.अजित पवार (Ajit Pawar) यांनी व्यक्त केले.

औंध येथील औंध शिक्षण मंडळाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते,यावेळी चेअरमन गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी, चारुशिलाराजे पंतप्रतिनिधी, विश्वस्त हणमंतराव शिंदे, राजेंद्र माने, प्रशांत खैरमोडे, श्रीधर कंग्राळकर, अँड.अतुल क्षीरसागर, शंकरराव खैरमोडे, बापूसाहेब कुंभार, आब्बास आतार, शाकिर आतार, प्रदीप कणसे, संजय निकम यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी बोलताना ना.अजित पवार म्हणाले की,औंधमध्ये साने गुरुजी,ग.दि.माडगूळकर,शंतनू किर्लोस्कर आदींनी या ठिकाणी शिक्षण घेतले आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी औंध शिक्षण मंडळाच्या विद्याशाखांना भौतिक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कटिबद्ध असल्याचेही ना.पवार यांनी सांगितले. सभेच्या प्रारंभी या वर्षात निधन झालेल्या सभासदांना आदरांजली वाहण्यात आली,यावेळी सचिव प्रदीप कणसे,सहसचिव संजय निकम यांनी अहवाल वाचन केले.

चारुशिलाराजे पंतप्रतिनिधी यांची विश्वस्तपदी निवड- 

या सर्वसाधारण सभेत चारुशिलाराजे पंतप्रतिनिधी यांची सर्वानुमते विश्वस्तपदी निवड करण्यात आली, उपस्थित सभासदांनी तसेच औंध ग्रामस्थांनी या निवडीबद्दल अभिनंदन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Taliban Airstrike Pakistan : पाकिस्तानमध्ये घुसून तालिबानकडून हवाई हल्ला?; अनेक दहशतवादी मारल्याचा अफगाणकडून दावा, सीमावाद उफाळला

Low Calorie Ragi Thalipeeth: डाजबिटीज फ्रेंडली! कॅल्शियम, प्रोटीन आणि फायबरने भरपूर नाचणीचं थालीपीठ; जाणून घ्या सोपी रेसिपी

Pune Shiv Sena setback: पुण्यात ठाकरे गटाला मोठा धक्का; २६ वर्षांतल्या ९ संपर्कप्रमुखांपैकी ५ जणांनी सोडली साथ, चौघे शिंदे गटात

Pune Nashik Railway : पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेचा मूळ मार्ग कायम ठेवण्याचा निर्धार; जीएमआरटीकडून अडथळा नसल्याचा लोकप्रतिनिधींचा दावा

भविष्यवेध : बीएस्सी ॲग्रीकल्चर की बी. फार्मसी?

SCROLL FOR NEXT