crime  sakal
सातारा

तिप्पट पैशाचे आमिष; मसूरच्या युवकांची ४२ लाखांची फसवणूक

तिप्पट फायदा मिळवून देण्याचे आमिष दाखवून मसूर व उंब्रज येथील युवकांना ४२ लाख ३६ हजारांना गंडा घातल्याचा प्रकार युवकांनी पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर उघडीस आला.

गजानन गिरी

मसूर - ट्रेंडिंग कंपनीत गुंतवणूक केल्यावर तिप्पट फायदा मिळवून देण्याचे आमिष दाखवून मसूर व उंब्रज येथील युवकांना ४२ लाख ३६ हजारांना गंडा घातल्याचा प्रकार युवकांनी पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर उघडीस आला आहे. याप्रकरणी अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल कण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. या घटनेने गुंतवणूक करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

पोलिसांची माहिती अशी, अभिषेक चंद्रशेखर वेल्हाळ (रा. मसूर) यांनी दिलेल्या फिर्यादीमध्ये त्यांना एक जानेवारी २०२१ मध्ये वेगवेगळ्या मोबाईल नंबरवरून फोन करून ट्रिनिटी एफएक्स व आँस्कर एफएक्स या ट्रेंडिंग अॅपविषयी माहिती सांगण्यात आली. त्यांनी त्यांचे कंपनीचे अकाउंट नंबर फोनवर पाठवले. वेळोवेळी पैशाची गुंतवणूक करण्यास सांगितले. त्यामध्ये गुंतवलेले पैसे दोन महिन्यांमध्ये तिप्पट होतील, असे सांगितले. म्हणून मी १ जानेवारी ते ३१ जुलै २०२१ पर्यंत २१ लाख ९१ हजार ३६० रुपये पाठवले. त्याचबरोबर माझे मित्र सचिन प्रकाश जगदाळे, आनंदा सदाशिव जगदाळे, मोहन प्रकाश जगदाळे (सर्व रा. मसूर), दिग्विजय पांडुरंग मराठे (रा. उंब्रज) यांच्याशीही संबंधित कंपनीच्या अनोळखी व्यक्तींनी वेगवेगळ्या मोबाईल नंबरवरून संपर्क साधून पैशाची गुंतवणूक करण्यास सांगितले.

त्यावरून सचिन जगदाळे यांनी सात लाख २४ हजार, आनंदा जगदाळे यांनी सहा लाख ७१ हजार ५००, दिग्विजय मराठे यांनी दोन लाख, मोहन जगदाळे यांनी चार लाख ५० हजार रुपये पाठवले. संबंधितांना सर्व व्यवहार अॅपच्या माध्यमातून फोनवर दिसत होते. मात्र, अचानक जुलै २०२१ महिन्यामध्ये ॲप अचानक बंद झाले. त्यावर मी व मित्रांनी संबंधित फोन नंबरवर वारंवार संपर्क साधला; परंतु त्यांनी काहीही प्रतिसाद दिला नाही. त्यावरून फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर संबंधिताविरोधात फसवणूक झाल्याची फिर्याद दाखल केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ड्रायव्हरच्या बाजूला मान खाली घालून बसलेले मनोज जरांगे; तब्येत अचानक बिघडली, डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू, नेमकं काय झालं?

Devbhumi Jat Name Change Latest News : सांगलीकरांसाठी आनंदाची बातमी! 'देवभूमी जत' नामकरणाचा मार्ग मोकळा, गॅझेट नोटिफिकेशन लवकरच; पालकमंत्री चंद्रकांतदादांची माहिती

Chamoli Tunnel Tragedy: ३० तासांनंतरही ३ मजूर बेपत्ता; बोगद्यातील साचलेले पाणी ठरतेय रेस्क्यू ऑपरेशन्समध्ये मुख्य अडथळा

Marathi News Live Updates : पुण्यातील डेक्कन परिसरातील कॅफेत पहाटे कोयता गँगचा धुमाकूळ

Khambatki Ghat Traffic : पुणे-सातारा महामार्गावर खंबाटकी घाटात वाहनांच्या लांबच लांब रांगा; पारगाव-खंडाळा परिसरात वाहतूक ठप्प, प्रवाशांचे हाल

SCROLL FOR NEXT