Political Leaders sakal
सातारा

Social Media War : माणमध्ये रंगतेय सोशल मीडिया वॉर; राजकीय वातावरण निघाले ढवळून

मर्सिडीज गाडीपासून सुरू झालेले अन् आता कार्यकर्त्यांच्या घरापर्यंत पोचलेले सोशल मीडिया वॉर माण तालुक्यात जोरात सुरू आहे.

रूपेश कदम

दहिवडी - मर्सिडीज गाडीपासून सुरू झालेले अन् आता कार्यकर्त्यांच्या घरापर्यंत पोचलेले सोशल मीडिया वॉर माण तालुक्यात जोरात सुरू आहे. प्रथमच आमदार गोरे व समर्थकांना विरोधकांकडून जशास तसे उत्तर मिळत असल्याने राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे.

आमदार गोरे हे आक्रमक नेते आहेत. त्यांना शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) शेखर गोरे हेच जोरदार प्रत्युत्तर देत होते. आमदार गोरेंना ते थेट आव्हान देत होते. मात्र, अभयसिंह जगताप यांच्या मर्सिडीज गाडीबाबत कार्यकर्त्यांच्या बैठकीत आमदार गोरे यांनी टीकाटिप्पणी केली.

या टीकाटिप्पणीला श्री. जगताप यांनी पत्रकार परिषद घेऊन खरमरीत प्रतित्युर दिले. श्री. जगताप यांनी आमदार गोरेंशी घेतलेल्या थेट पंग्याची सर्वत्र जोरदार चर्चा झाली. श्री. जगताप यांच्यानंतर दुसऱ्या दिवशी पत्रकार परिषद घेऊन अनिल देसाई यांनी आमदार गोरेंवर टीका केली. उदयनराजे संबंधित घटनांचा गौप्यस्फोट करून त्यांनी खळबळ उडवून दिली होती. एकापाठोपाठ एक आमदार गोरेंवर शाब्दिक हल्ले झाले.

त्यातून सावरलेल्या आमदार गोरे समर्थकांनी पत्रकार परिषद घेऊन पुन्हा नव्या जोमाने हल्ला चढवला. यावेळी कार्यकर्ते चांगलेच बिथरलेले दिसून आले. त्यांच्या बोलण्यातून श्री. जगताप व श्री. देसाई यांच्याबद्दल राग स्पष्टपणे दिसत होता.

यापूर्वी कार्यकर्त्यांच्या बैठकीत, तसेच सभांतून आमदार गोरे यांनी विरोधकांवर टीका केली आहे. ही वक्तव्याचे आमदार गोरेंचे कार्यकर्ते व्हिडिओ व्हायरल करायचे; पण आता त्याला प्रत्युत्तर मिळत आहे. सोशल मीडियावरही त्याचे पडसाद उमटताना दिसत आहेत. त्यात कोणीही माघार घेण्याची मानसिकतेत दिसत नाही.

‘आरे’ला का रे...

मोठ्या संघर्षातून लोकसभेला मिळालेल्या विजयामुळे महाविकास आघाडी सध्या जोशात आहे, तर महायुतीतील भाजपला हा धक्का सहन झालेला नाही. त्यामुळे यापूर्वी शांत असणारे महाविकासचे नेते व कार्यकर्ते ‘आरे’ला का रे, करू लागले आहेत.

अन्यथा अनर्थ अटळ...

आमदार गोरे यांच्या आक्रमक भाषणांचे व्हिडिओ कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात व्हायरल करताना दिसतात. यापूर्वी शेखर गोरे देत असलेले उत्तर आता अभयसिंह जगताप, अनिल देसाई एवढेच नव्हे तर त्यांचे कार्यकर्ते सुद्धा देऊ लागले आहेत. या राजकीय घमासानीत एखादी छोटी घटना वा कृत्य मोठ्या घटनेचे कारण ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नेते, कार्यकर्त्यांनी संयम ठेवण्याची आवश्यकता आहे, अन्यथा अनर्थ अटळ आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT