सातारा

सातारा : वेळ आल्यावर व्याजासह हिशोब चुकता करीन; नगराध्यक्षांचे पवारांना प्रत्युत्तर

सिद्धार्थ लाटकर

सातारा : मी वेळ आल्यावर उत्तर देईन आणि संबंधितांचा व्याजासह हिशोब करीन, असा इशारा नगराध्यक्षा माधवी कदम यांनी पालिकेच्या बांधकाम समितीच्या सभापती सिद्धी पवार यांना दिला आहे. साै. पवार यांनी नगराध्यक्षा माधवी कदम यांच्या कारभारावर काही दिवसांपुर्वी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून टीका केली हाेती. त्यावेळी पवार यांनी लोकसभेच्या पोटनिवडणुकीत उदयनराजे भोसलेंच्या पराभवात निष्क्रिय नगराध्यक्षांचा मोलाचा वाटा असल्याचा आरोपही केला हाेता. 

बांधकाम सभापती सिद्धी पवार यांनी नगराध्यक्षा कदम यांच्या कारभारावर आक्षेप घेतला होता. हे आक्षेप खोडून काढणारे पत्रक नगराध्यक्षा माधवी कदम यांनी प्रसिद्धीस दिले. त्यानंतर पुन्हा साै. पवार यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून  नगराध्यक्षा कदम यांनी साताऱ्यात स्वनिधीतून कोणतेही ठोस काम उभारलेले नाही. इतरांनी केलेल्या कामांचे श्रेय घेण्यात त्या धन्यता मानतात. कोणतेही राजकीय कार्य नसताना सातारकरांनी खासदार उदयनराजेंकडे बघून त्यांना नगराध्यक्षपदी बसविले. त्या सातारकरांची आणि खासदार उदयनराजेंची त्यांनी घोर निराशा केली आहे अशी टीका केली. 

उदयनराजेंच्या पराभवात तुमचा माेलाचा वाटा

दरम्यान याबाबत नगराध्यक्षा माधवी कदम यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या विषयाला जास्त महत्त्व देण्याची गरज वाटत नाही असे सांगितले. त्या म्हणाल्या, वेळ आल्यावर उत्तर देईन आणि संबंधितांचा व्याजासह हिशोब करीन असेही स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT