Dr. Narendra Dabholkar esakal
सातारा

डॉ. दाभोलकरांच्या खुनामागील सूत्रधार का सापडत नाही?

दाभोलकरांच्या खुनाच्या सूत्रधाराला पकडण्यात पोलिसांना अपयश

सकाळ डिजिटल टीम

सातारा : डॉ. नरेंद्र दाभोलकर (Dr. Narendra Dabholkar) यांच्या खुनाला येत्या २० ऑगस्ट रोजी आठ वर्षे पूर्ण होत आहेत, तरीही खुनाच्या सूत्रधाराला पकडण्यात अपयश आले आहे. त्यामुळे सूत्रधारचे झाले काय? असा प्रश्‍न महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे (Maharashtra Andhashraddha Nirmoolan Samiti) शासनाला पत्रकाद्वारे विचारण्यात आला आहे. डॉ. दाभोलकर यांच्या खुनामागील सूत्रधार कोण आहेत हे सीबीआयने शोधून काढले पाहिजे, अन्यथा देशातील विवेकवादी विचारवंत, कार्यकर्ते, पत्रकार यांच्या अभिव्यक्तीला असलेला धोका संपणार नसल्याचेही अंनिसने म्हटले आहे.

सीबीआयने (CBI) वीरेंद्र तावडे, शरद कळसकर, सचिन अंदुरे, संजीव पुनाळेकर व विक्रम भावे यांना अटक करून त्यांच्यावर आरोपपत्र दाखल केले.

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनातील संशयित आरोपी म्हणून सीबीआयने (CBI) २०१६ मध्ये वीरेंद्र तावडे, ऑगस्ट २०१८ मध्ये शरद कळसकर आणि सचिन अंदुरे व मे २०१९ मध्ये संजीव पुनाळेकर व विक्रम भावे यांना अटक करून त्यांच्यावर आरोपपत्र दाखल केले. अमोल काळे, अमित डिगवेकर व राजेश बंगेरा या संशयित आरोपींच्या विरुद्ध सीबीआयने अजूनही आरोपपत्र दाखल केले नाही. या खुनाचा तपास वीरेंद्र तावडे व अमोल काळे यांच्या नावापर्यंत येऊन थांबला आहे. या खुनामागील सूत्रधार कोण आहेत हे अद्याप स्पष्ट झाले नाही. डॉ. दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे, प्रा. कलबुर्गी व गौरी लंकेश या चारही खुनांचे एकमेकांत गुंतलेले धागेदोरे तपास यंत्रणांनी उकलले आहेत. सीबीआयने दाखल केलेल्या पुरवणी आरोपपत्रात म्हटले, की खुनाचा तपास करताना या प्रकरणातील संशयित आरोपींचा कॉ. गोविंद पानसरे, प्रा. कलबुर्गी व गौरी लंकेश यांच्या खुनाशी असलेला संबंध रेकॉर्डवर आला असल्याचेही अंनिसने म्हटले आहे.

डॉ. दाभोलकरांच्या खुनानंतरही अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते व इतर समविचारी नागरिक हे काम निष्ठेने व जोमाने पुढे नेत आहेत. रिंगण नाट्य, मानस मैत्री, जटा निर्मूलन, जादूटोणा विरोधी कायद्याच्या अंमलबजावणीचा पाठपुरावा, सामाजिक बहिष्कार विरोधी कायद्याच्या निर्मितीचा लढा, जात पंचायतीच्या मनमानीविरोधातील आंदोलन, विवेकवाहिनी अशा अनेक अंगांनी काम विकसित होत आहे. गेली आठ वर्षे २० ऑगस्ट रोजी समितीचे कार्यकर्ते व समविचारी संघटना देशभर ठिकठिकाणी डॉ. दाभोलकरांच्या खुनाचा निषेध करत हे काम जोमाने नेण्याचा निर्धार व्यक्त करत असल्याने अंनिसने पत्रकाद्वारे म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

European Union Warning: युद्ध थांबले तरी इंधन महागच राहणार; युरोपीय महासंघाचा इशारा, ‘विंडफॉल टॅक्स’ लागू होण्याची शक्यता!

Washim News: फसव्या लिंकमुळे बँक खाती होताहेत रिकामी; सायबर फसवणुकीचे प्रकार वाढले; नागरिकांनी सजग राहण्याची गरज

Chhatrapati Sambhajinagar Student Death : काळाचा घाला! परीक्षा देऊन घरी परतणाऱ्या विद्यार्थ्याला महापालिकेच्या डंपरने चिरडले; जागीच मृत्यू झाल्याने हळहळ

IPL 2026: आधी KL Rahul, आता रिषभ पंत! संजीव गोएंका यांनी पुन्हा कर्णधाराला झापलं? X पोस्ट करत म्हणाले, LSG ची कहाणी...

Jalgaon Accident News: दोन दुचाकींचा अपघात; एक ठार, तिघे जखमी; १ ठार, ३ गंभीर जखमी; पोलिसांनी गुन्हा नोंदवला

SCROLL FOR NEXT