Lakhimpur Kheri case esakal
सातारा

'देशात इंग्रजांपेक्षाही अमानुष प्रकार; शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडण्याचा प्रयत्न'

हेमंत पवार

देशातील जनतेला स्वतःच्या न्याय हक्कासाठी लढा देत असतानाही इंग्रजापेक्षा अमानुष प्रकार करण्याचे प्रकार वाढले आहे.

कऱ्हाड (सातारा) : लखीमपूर घटनेच्या (Lakhimpur Kheri) निषेधार्थ महाराष्ट्र सरकारने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला (Maharashtra Band) चांगला प्रतिसाद मिळत आहे. सातारा जिल्ह्यातील जनतेने मनापासून या बंदला उत्स्फुर्त प्रतिसाद दिला आहे, अशी माहिती सहकारमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील (Minister Balasaheb Patil) यांनी दिली. दरम्यान, देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान पत्करलं. तो लढा इंग्रज, परदेशीयांविरोधात लढा होता. मात्र, देशातील जनतेला स्वतःच्या न्याय हक्कासाठी लढा देत असतानाही इंग्रजापेक्षा अमानुष प्रकार करण्याचे प्रकार वाढले आहेत, असा आरोपही मंत्री पाटील यांनी केला.

महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर मंत्री पाटील बोलत होते. ते म्हणाले, कृषी कायद्याच्या विरोधात वर्षभर उत्तर भारतात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. केंद्र शासनानं हे आंदोलन दडपण्याचा सातत्याने प्रयत्न केला. काहींना अटक करण्याचा प्रयत्न केला. लखीमपूर येथील आंदोलनातील शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केंद्रीय राज्यमंत्र्यांच्या मुलाने केला. दुर्दैवाने त्यात शेतकरी मृत्युमुखी पडले. पण, त्या संशयितांना तत्काळ अटकही झाली नाही. हे आंदोलन दडपण्याचा भयानक प्रयत्न त्यांनी केला.

देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान पत्करलं. तो लढा इंग्रज, परदेशीयांविरोधात लढा होता. मात्र, देशातील जनतेला स्वतःच्या न्याय हक्कासाठी लढा देत असतानाही इंग्रजापेक्षा अमानुष प्रकार करण्याचे प्रकार वाढले आहे. त्याच्या निषेधार्थ आज सोमवारी महाविकास आघाडी सरकारनं महाराष्ट्रात बंद पाळण्याचा निर्णय घेतला आहे. सातारा जिल्ह्यातील जनतेने मनापासून या बंदला उत्स्फुर्त प्रतिसाद दिला आहे. व्यापाऱ्यांनीही सहकार्याची भूमिका घेतलीय. देशातील शेतकरी जगला पाहिजे ही भूमिका बंद मागे आहे. लखीमपूरची ही अमानवी घटना घडली आहे, त्याच्या निषेधार्थ हा बंद यशस्वीपणे मार्गक्रमण करत आहे. आपण सायंकाळपपर्यंत हा बंद पाळावा, ही विनंती, असंही त्यांनी आवाहन केलंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ED seizes Anil Ambani assets : अनिल अंबानींविरुद्ध ‘ED’ची मोठी कारवाई! १ हजार ८८५ कोटींच्या मालमत्ता तात्पुरती जप्त

दिलीप सोपलांनी जागवल्या आठवणी! अजितदादांनीच केले मला मंत्री; चेष्टा करणारा मी एकमेव आमदार, एकदा मी झोपेत असताना सकाळी ६ वाजताच दादांचा कॉल आला अन्‌...

Ajit Pawar Death News LIVE Updates : पायलट सुमित कपूर दिल्लीचा रहिवासी होते

Pune University Exam : मोठी बातमी! पुणे विद्यापीठाच्या गुरुवारी होणारी हिवाळी सत्र परीक्षा पुढे ढकलली

Phulambri News : 'अरे राजू, नुसतेच नारळ फोडतोय का?' – दादांचा तो सवाल, पाथ्रीच्या विकासाची दिशा ठरवणारा क्षण - राजेंद्र पाथ्रीकर

SCROLL FOR NEXT