सातारा

केशरी कार्डधारकांसाठी शासनाने घेतला 'हा' निर्णय

उमेश बांबरे

सातारा : कोरोनात पुरवठा विभागाने प्राधान्य कुटुंब व अंत्योदय लाभार्थ्यांना तीन महिने धान्य उपलब्ध केले होते. त्याप्रमाणे आता केशरी कार्डधारकांनाही जुलै, ऑगस्टमध्ये गहू, तांदूळ सवलतीच्या दरात वितरित करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. सातारा जिल्ह्यातील 12 लाख 12 हजार लाभार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे.
काय सांगता! नाही नाही म्हणता...48 कोटी जमा झाले 

कोरोनाच्या काळात सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या माध्यमातून जीवनावश्‍यक वस्तू वितरित करून सर्वसामान्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न शासनाकडून झाला. त्यानुसार दारिद्य्ररेषा, अंत्योदय या शिधापत्रिकाधारकांना मोफत धान्य वितरण करण्यात आले. तर प्राधान्य कुटुंबातील तसेच केशरी कार्डधारक लाभार्थ्यांना सवलतीच्या दरात धान्य उपलब्ध केले होते. एप्रिल, मे आणि जून महिन्यात स्वस्त धान्य दुकानांतून धान्याचे वितरण झाले. गहू, तांदूळ तसेच चणाडाळ व तूरडाळीचाही समावेश झाला.

 श्रीनिवास पाटील म्हणतात, वर्क फ्रॉम होमवाल्यांसाठी 'हे' करा 

सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने लॉकडाउन पुन्हा वाढविण्यात आलेले आहे. तर कोरोना बाधित रुग्ण सापडलेल्या ठिकाणी सूक्ष्म प्रतिबंधात्मक क्षेत्र जाहीर केले आहे. त्यामुळे नागरिकांना किमान जीवनावश्‍यक वस्तू मिळाव्यात, यासाठी रेशनवर धान्य उपलब्ध करून दिले जात आहे. 
अन्नसुरक्षा योजना व शेतकरी योजनेंतर्गत समाविष्ट न झालेल्या केशरी (एपीएल) शिधापत्रिकाधारकांना मे व जून असे दोन महिने सवलतीच्या दरात अन्नधान्य उपलब्ध केले होते. त्यानुसार जुलै व ऑगस्टमध्येही केशरी शिधापत्रिकाधारकांना सवलतीत अन्नधान्य उपलब्ध करून देण्यासाठी मुदतवाढ देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार मे, जूनप्रमाणे जुलै व ऑगस्टमध्येही अन्नधान्य सवलतीत दिले जाणार आहे.

बेरोजगार आहात? काळजी करू नका, प्रशिक्षणादरम्यान मिळणार पगार अन्‌ त्यानंतर नोकरीची हमी!

सातारा जिल्ह्यातील 'हे' शहर पुढचे पाच दिवस राहणार बंद

केशरी शिधापत्रिकांना आठ रुपये किलो गहू व 12 रुपये किलो तांदूळ याप्रमाणे प्रति व्यक्ती तीन किलो गहू व दोन किलो तांदूळ असे पाच किलो धान्य दिले जाणार आहे. त्यासाठी लागणारा धान्याचा कोटाही मंजूर झाला आहे. 3637 मेट्रिक टन गहू व 2425 मेट्रिक टन तांदूळ जिल्ह्याला देण्यात आला आहे. हा मंजूर कोटा जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी तातडीने उचलण्याच्या सूचना शासनाने केल्या आहेत. त्यामुळे आगामी आठवडाभरात रेशन दुकानांवर केशरी शिधापत्रिकाधारकांसाठी सवलतीच्या दरातील गहू, तांदूळ उपलब्ध होणार आहे. 

शिवेंद्रसिंहराजेंनी का बरं मानले अजित पवारांचे आभार, वाचा सविस्तर

लाभार्थी, उपलब्ध धान्य अन्‌ दर 

जिल्ह्यातील लाभार्थी : 12 लाख,12 हजार 482 
प्रति व्यक्ती मिळणारे धान्य : तीन किलो गहू, दोन किलो तांदूळ 
सवलतीचा दर : आठ रुपये किलो गहू, 12 रुपये किलो तांदूळ 
उपलब्ध कोटा : गहू 3637, तांदूळ 2425 तांदूळ (मेट्रिक टन) 

संपादन - सिद्धार्थ लाटकर

'या' कामाचे श्रेय फक्त आणि फक्त उदयनराजेंच; काेणी उठविला आवाज वाचा सविस्तर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Virat Kohli Century : विराट कोहलीचा वर्ल्ड रेकॉर्ड! KKR विरुद्ध शतकी खेळी अन् आशियात कोणालाच न जमलेला केला पराक्रम...

IPL 2026 : चेन्नई सुपर किंग्सला खूप मोठा धक्का! मॅच विनर खेळाडूला दुखापत, उपचारासाठी लंडनला जाणार; स्पर्धेतून माघार निश्चित

IPL 2026 Playoff Scenario: विराट कोहलीचा झंझावात अन् RCB गुणतालिकेत अव्वल! KKR चे आव्हान संपले का? जाणून घ्या समीकरण

RCB VS KKR LIVE: विराट कोहलीची पहिली धाव अन् सेलिब्रेशन जणू Century सारखं, चाहत्यांना हसू आवरेना... Viral Video ची मजेशीर गोष्ट

Milk Rate Hike: महागाईचा आणखी एक फटका! अमूलनंतर मदर डेअरीनेही दूध दर वाढवले, किती रुपयांनी? बजेट कोलमडणार

SCROLL FOR NEXT