सातारा

'गांधीजीके देशमें मोदीशाही नहीं चलेगी..'; वडूजात महाविकास आघाडीचा आक्रमक पवित्रा

आयाज मुल्ला

वडूज (जि. सातारा) : "जय जवान.. जय किसान, नहीं चलेगी, नहीं चलेगी तानाशाही नहीं चलेगी.. गांधीजींके देशमें मोदीशाही नहीं चलेगी...'चा नारा देत आज येथे कृषी कायद्यांचा निषेध व्यक्त करण्यात आला. खटाव तालुक्‍यातील महाविकास आघाडी व मित्र पक्ष, सामाजिक संघटनांच्या वतीने येथे मोर्चा काढण्यात आला. 

या वेळी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, रणजितसिंह देशमुख, बाजार समितीचे माजी सभापती अशोकराव गोडसे, कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष डॉ. विवेक देशमुख, प्रा. बंडा गोडसे, मानाजी घाडगे, माजी सभापती संदीप मांडवे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य प्रवक्ते अनिल पवार, जिल्हाध्यक्ष तानाजीराव देशमुख, मोहनराव देशमुख, मोहनराव जाधव, शंकरराव गोडसे, नगराध्यक्ष सुनील गोडसे, माजी नगराध्यक्ष डॉ. महेश गुरव, युवराज पाटील, विजय शिंदे, विजय काळे, इम्रान बागवान आदीसह शेतकरी उपस्थित होते. 

येथील हुतात्मा स्मारकापासून शहरातून हा मोर्चा काढण्यात आला. "जय जवान, जय किसान.. केंद्र शासनाच्या कृषी कायद्याचा धिक्कार असो, नहीं चलेगी, नहीं चलेगी तानाशाही नहीं चलेगी.. आदी घोषणा या वेळी देण्यात येत होत्या. त्यानंतर तहसीलदार कार्यालयात काही वेळ धरणे आंदोलन करण्यात आले. या वेळी विविध मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. केंद्र शासनाने लादलेल्या कृषी कायद्याचा तीव्र शब्दांत निषेध केला. तानाजीराव देशमुख यांनी केंद्र शासनाने लादलेल्या कृषी विरोधी कायद्यांची माहिती दिली. तहसीलदार किरण जमदाडे यांना निवेदन देण्यात आले. डॉ. गुरव यांनी सूत्रसंचालन केले. विजय शिंदे यांनी आभार मानले. मोर्चात माजी सरपंच अनिल गोडसे, अर्जुन गोडसे, सचिन माळी, आमिन आगा, विजय जगदाळे, संतोष भोसले, सिकंदर मुल्ला, दाऊद मुल्ला आदी सहभागी झाले होते. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT