सातारा

शेतकऱ्यांनाे! वीजबिलातील 50 टक्के सवलतीचा लाभ घ्या; महावितरणचे आवाहन

जयंत पाटील

कोपर्डे हवेली (जि. सातारा) : सप्टेंबर 2020 पर्यंतच्या वीजबिलात 50 टक्के सवलत दिली असून शेतकऱ्यांनी मार्च अखेरपर्यंत वीजबिले भरून संपूर्ण सवलतीचा फायदा घ्यावा. त्यानंतरच्या वीजबिलास सवलत नाही. चालू बिले मुदतीत भरली नाहीत, तर नाईलाजास्तव वीज कनेक्‍शन बंद करावी लागतील, अशी माहिती महावितरणचे कार्यकारी अभियंता अभिमन्यू राख यांनी दिली.
 
शेतीपंपांच्या वीजबिलासंदर्भातील बैठकीत ते येथे बोलत होते. शेतकऱ्यांच्या सोयीनुसार एक दिवस महावितरणचे बिलिंग कर्मचारी गावात येऊन बिले दुरुस्त करून देतील, असेही त्यांनी नमूद केले. अतिरिक्त कार्यकारी अभियंता नवाळे, शाखा अधिकारी बद्रायणी, प्रधान तंत्रज्ञ सय्यद, शेतकरी सुदाम चव्हाण, लालासाहेब पाटील, संजय चव्हाण, सुनील चव्हाण, संदीप चव्हाण, हिम्मत चव्हाण व ग्रामस्थ उपस्थित होते.

श्री. राख म्हणाले, ""सप्टेंबर 2020 पर्यंतचे वीजबिलास 50 टक्के सवलत आहे. ही योजना 2023 पर्यंत चालू राहील. शेतकऱ्यांनी मार्च अखेरपर्यंत वीजबिले भरून संपूर्ण सवलतीचा लाभ घ्यावा.'' यावेळी शेतकरी भास्कर चव्हाण यांनी शेतकऱ्यांना वीजबिले वेळच्या वेळी मिळावीत, अशी मागणी केली.

चुकीच्या पद्धतीने वसुली केल्यास अधिकाऱ्यांना काळे फासू; बळीराजाचा महावितरणला कडक इशारा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel-CNG Price Today: पेट्रोल-डिझेल आणि CNG चे नवे दर जाहीर; पुणे, मुंबईसह महाराष्ट्रात आज किती भाव?

Latest Marathi News Update : चित्रपट महामंडळ निवडणुकीत समर्थ पॅनेलचे सर्व उमेदवार विजयी

Uddhav Thackeray INDIA Alliance : उद्धव ठाकरे इंडिया आघाडीतून बाहेर पडणार?, ठाकरेंच्या सवालाने दिल्लीतील बैठकीत नाराजीचे सूर

Donald Trump : मैत्रीत दुरावा ! डोनाल्ड ट्रम्प यांचा इस्त्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांना इराण हल्ल्यावरुन कडक इशारा, नेमकं काय घडलं?

राऊत-देशमुख चौथ्यांदा भेट; मित्रासाठी मालक मैदानात, विधान परिषद निवडणुकीच्या रणनीतीवर चर्चा, मैत्रीची साथ अन् पक्षनिष्ठेचा संदेश..

SCROLL FOR NEXT