Koparde Haveli
Koparde Haveli esakal
सातारा

कोपर्डे हवेलीत जोरदार पाऊस; शेतात पाणी साचून टोमॅटोचे मोठे नुकसान

जयंत पाटील

कोपर्डे हवेली (सातारा) : बुधवारी रात्रीपासून पडत असलेल्या मुसळधार पावसाने (Heavy Rain) शेतात पाणीच-पाणी झाल्यामुळे टोमॅटोसह (Tomato) इतर पिकांचे कोपर्डे हवेली परिसरात मोठे नुकसान झाले आहे. गेल्या तीन दिवसांपासून सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस पडत असल्याने येथील शेतात (Farm) मोठ्या प्रमाणात पाणी जावून हातातोंडाशी आलेल्या पिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून शेतकरी (Farmer) पुन्हा आर्थिक संकटात सापडला आहे. (Major Damage To Tomato Crop Due To Heavy Rain In Koparde Haveli Area Satara Agricultural News)

गेल्या तीन दिवसांपासून सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस पडत असल्याने येथील शेतात मोठ्या प्रमाणात पाणी जावून हातातोंडाशी आलेल्या पिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

गेल्या महिन्यात चक्रीवादळाचा (Cyclone Tauktae) पिकांना फटका बसला असतानाच आता शेतकऱ्यांपुढे पावसाचे संकट उभे राहिले आहे. बुधवारी रात्री पडलेल्या मुसळधार पावसामुळे आणि गुरूवारी उघडझाप सुरू असलेल्या पावसामुळे परिसरातील ओढे-नाले दुथडी भरुन वाहत आहेत. गुरुवारी परिसरात टोमॅटो पिकांचे तोडे सोडून शेतीतील सर्व कामे बंद होती‌.

Heavy Rain

कराड-मसूर रस्त्यावरील पूर्वेच्या बाजूला पाणी साचून राहिल्याने शिवार जलमय झाला आहे. हा पाऊस पेरणी झालेल्या पिकाला पूरक मानला जात असला, तरी माळव्याच्या पिकाला हानीकारक आहे. माळव्याच्या पिकांत साचलेले पाणी शेतकरी शेतातून काढून देण्याचा प्रयत्न करत आहेत. पावसाच्या प्रतीक्षेत असलेले शेतकरी सुखावले असले, तरी शेतात पाणी साचून राहिल्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. त्यामुळे वर्षभरात मेहनतीने पिकवलेले पीक या मुसळधार पावसामुळे वाया जाणार आहे.

Major Damage To Tomato Crop Due To Heavy Rain In Koparde Haveli Area Satara Agricultural News

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Raut : राज्यात महाविकास आघाडीला ३० ते ३५ जागांवर विजय मिळेल; संजय राऊत यांचा दावा

Onion Export News : कांदा निर्यातबंदी केंद्राने उठवली पण भाव वाढ होणार का?

IPL 2024, GT vs RCB Live Score: फाफ डू प्लेसिसने जिंकला टॉस, मॅक्सवेलचं झालं पुनरागमन; जाणून घ्या गुजरात-बेंगळुरूची प्लेइंग-11

Fact Check: उद्धव ठाकरेंना काँग्रेस कार्यकर्ते बोलू देत नसल्याचा दावा खोटा; प्रचार सभेतील अर्धवट व्हिडिओ व्हायरल

Latest Marathi News Live Update : अभिनेता साहिल खानला दोन दिवसांची पोलीस कोठडी

SCROLL FOR NEXT