सातारा

कोरेगावच्या उपाध्यक्षपदी मंदा बर्गे बिनविरोध 

राजेंद्र वाघ

कोरेगाव (जि. सातारा) : नगरपंचायतीच्या उपाध्यक्षपदी मंदा बर्गे यांची बिनविरोध निवड झाली आहे. संगीता बर्गे यांनी उपाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याने नवीन उपाध्यक्षाची निवड करण्यासाठी विशेष सभा बोलावण्यात आली होती.

त्यानुसार प्रांताधिकारी तथा अध्यासी अधिकारी ज्योती पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत मुख्याधिकारी विजया घाडगे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीस नगराध्यक्षा रेश्‍मा कोकरे, माजी उपाध्यक्षा संगीता बर्गे, मंदा बर्गे, अर्चना बर्गे, संजय पिसाळ, नितीन ओसवाल, प्रदीप बाचल, नागेश कांबळे, रेश्‍मा जाधव, सुलोचना फडतरे, शोभा येवले उपस्थित होते. तत्पूर्वी उपाध्यक्षपदासाठी मंदा बर्गे यांचा एकमेव अर्ज दाखल झाला.

हेही वाचा : ठाकरे कुटुंबियांच्या आवडत्या हाॅलिडे डेस्टिनेंशनला मिळाला ब वर्ग दर्जा

त्यामुळे मंदा बर्गे यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याची घोषणा करण्यात आली. निवडणूक प्रक्रिया पार पडल्यानंतर अध्यासी अधिकारी पाटील यांनी नूतन उपाध्यक्षा मंदा बर्गे यांचा सत्कार केला. नगरपंचायतीच्या वतीने नगराध्यक्षा रेश्‍मा कोकरे, मावळत्या उपाध्यक्षा संगीता बर्गे यांनीही नूतन उपाध्यक्षा मंदा बर्गे यांचा सत्कार केला.

Edited By : Siddharth Latkar 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : राज्यात परतीच्या पावसाचा जोर वाढणार; विदर्भ-मराठवाड्यासह २९ जिल्ह्यांना येलो अलर्ट

Chana Moong Dal Chilla: हेल्दी नाश्ता म्हणजे बेचव नाही! असा बनवा चणे-मूग चिला! खाल तर पुन्हा पुन्हा बनवाल

आजचे राशिभविष्य - 23 सप्टेंबर 2026

Azamgarh Hostage Crisis : आझमगढ हादरलं! आधी पत्नी अन् दोन पुजाऱ्यांची हत्या, मग मुलावर झाडली गोळी; ८ तासांच्या ऑपरेशननंतर आरोपीचा एन्काउंटर

Sangli ACB Trap : भूमी अभिलेखमधील दोघे लाच घेताना जाळ्यात; ईश्‍वरपुरात रचला सापळा, प्रॉपर्टी कार्डावर क्षेत्र दुरुस्तीसाठी घेतले 50 हजार

SCROLL FOR NEXT